"पाकिस्तानची सीमेवर घुसून बॉम्बस्फोट करण्याची सवय होती पण...", अमित शहांची काँग्रेसवर सडकून टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 09:05 PM2023-10-10T21:05:50+5:302023-10-10T21:06:36+5:30

Telangana Election 2023 : तेलंगणात निवडणुकीच्या तोंडावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.

  Telangana Election 2023 Union Home Minister Amit Shah has slammed Congress over Pakistan's border incursions  | "पाकिस्तानची सीमेवर घुसून बॉम्बस्फोट करण्याची सवय होती पण...", अमित शहांची काँग्रेसवर सडकून टीका 

"पाकिस्तानची सीमेवर घुसून बॉम्बस्फोट करण्याची सवय होती पण...", अमित शहांची काँग्रेसवर सडकून टीका 

Amit Shah Telangana Visit : तेलंगणात निवडणुकीच्या तोंडावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तेलंगणातील सिकंदराबाद येथील इम्पीरियल गार्डन येथे झालेल्या संवादात्मक बैठकीत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, काँग्रेसच्या राजवटीत देशाची अंतर्गत सुरक्षा अत्यंत बिकट होती. देशात रोज कुठे ना कुठे पाकिस्तानातून दहशतवादी हल्ला होत होता आणि आपल्या देशाचे तत्कालीन पंतप्रधान गप्प बसले होते. मात्र मोदींच्या राजवटीत देशाची अंतर्गत सुरक्षा चांगली आहे.

तसेच आजच्या घडीला पाकिस्तान आपल्या देशावर हल्ला करण्याचा विचारही करू शकत नाही, असा दावा त्यांनी केला. "काँग्रेस सरकारच्या काळात भारताच्या सीमेत घुसून स्फोट घडवण्याची पाकिस्तानची सवय होती. त्यांनी उरी आणि पुलवामामध्ये कट रचले. पण, पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या रूपात चोख प्रत्युत्तर देण्यात आले", अशा शब्दांत शहा यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.

२०१४ मध्ये जनतेते देशातील अस्थिरता संपवली
अमित शहा यांनी आणखी सांगितले की, आज जगभर भारताचा डंका आहे. मोदी सरकारच्या काळात आपल्या देशाचा जगभर आदर केला जात आहे. काँग्रेसच्या काळात आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण अस्पष्ट होते, पण आज ते स्पष्ट आहे. २०१४ मध्ये देशातील जनतेने मोठा निर्णय घेऊन अस्थिरतेचे वातावरण संपवले. जनतेने आम्हाला पूर्ण बहुमत दिले. पक्षाची सत्ता येऊन नऊ वर्षे  झाली असली तरी आज आमचे विरोधक देखील पंतप्रधान मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप करू शकत नाहीत. मोदींच्या कार्याचे कौतुक करताना शहा म्हणाले, "नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि ९ वर्षात देशाची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर पोहोचली. लवकरच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. याबाबत कोणालाच शंका नाही."

Web Title:   Telangana Election 2023 Union Home Minister Amit Shah has slammed Congress over Pakistan's border incursions 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.