नवी दिल्ली: भारतीय वायुदलाच्या (IAF) स्वदेशी तेजस फायटर जेट संदर्भात अलीकडेच माध्यमांमध्ये पसरलेल्या क्रॅशच्या बातम्यांवर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने स्पष्टीकरण दिले आहे. HAL ने स्पष्ट केले की, तेजस फायटर जेट क्रॅश झाले नाही. लँडिंगदरम्यान रनवेवर आलेला तो केवळ किरकोळ तांत्रिक बिघाड होता.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
तेजस क्रॅश झालेच नाही
HAL ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर अधिकृत निवेदन जारी करत म्हटले की, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये तेजस फायटर जेट क्रॅश झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, तेजसचा अपघात झालाच नाही. संबंधित घटना ही जमिनीवर घडलेली एक किरकोळ तांत्रिक समस्या होती.
तेजसचा सुरक्षिततेचा मजबूत रेकॉर्ड
HAL ने पुढे सांगितले की, तेजस हे जगातील अत्याधुनिक फायटर जेट्सपैकी एक असून, त्याचे सुरक्षा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. ठराविक मानक कार्यपद्धतीनुसार (SOP) या तांत्रिक मुद्द्याची सखोल चौकशी सुरू आहे. HAL आणि भारतीय वायुदल संयुक्तपणे या समस्येवर काम करत असून लवकरच त्यावर तोडगा काढला जाईल.
कशी पसरली होती अफवा?
माध्यमांमध्ये अशी माहिती समोर आली होती की, 7 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान सीमेजवळील एका फॉरवर्ड एअरबेसवर ट्रेनिंग उड्डाणानंतर लँडिंग करताना तेजस फायटर जेट क्रॅश झाले, तर पायलटने इजेक्ट करून सुरक्षित बाहेर पडल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, HAL ने या सर्व बातम्या अफवा असल्याचे सांगितले आहे.
मागील काही अपघातांमुळे वाढले संशय
गेल्या दोन वर्षांत तेजस फायटर जेट संदर्भात काही गंभीर घटना घडल्या होत्या.
2024: राजस्थानच्या जैसलमेर येथे तेजस फायटर जेट क्रॅश; पायलट सुरक्षित
2025: दुबई एअर शोदरम्यान तेजस फायटर जेट अपघात; या दुर्घटनेत पायलटचा मृत्यू
या घटनांमुळे नव्या अफवांना अधिक हवा मिळाल्याचे मानले जात आहे. दुबईतील अपघाताची चौकशी अद्याप सुरू आहे.
भारतीय वायुदलात किती तेजस जेट्स?
संरक्षण सचिव आर. के. सिंह यांच्या माहितीनुसार, सध्या IAF च्या ताफ्यात 38 तेजस फायटर जेट्स सेवेत आहेत. तर, सुमारे 80 तेजस जेट्सचे उत्पादन सुरू आहे. IAF ने तेजस Mk-1A चे 180 विमाने ऑर्डर केली आहेत. याशिवाय तेजस Mk-2 चे 97 मल्टी-रोल फायटर जेट्स ऑर्डर देण्यात आले आहेत.
Web Summary : HAL clarified that reports of a Tejas fighter jet crash are false. A minor technical issue occurred during landing. The aircraft has a strong safety record, with investigations ongoing into past incidents. Currently, 38 Tejas jets are in service with more on order.
Web Summary : HAL ने स्पष्ट किया कि तेजस लड़ाकू विमान के दुर्घटनाग्रस्त होने की खबरें झूठी हैं। लैंडिंग के दौरान एक मामूली तकनीकी समस्या आई। विमान का सुरक्षा रिकॉर्ड मजबूत है, पिछली घटनाओं की जांच जारी है। वर्तमान में, 38 तेजस जेट सेवा में हैं और अधिक ऑर्डर किए गए हैं।