पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 19:24 IST2025-11-21T19:23:17+5:302025-11-21T19:24:27+5:30
Tejas Crash Dubai Air Show : दुबई एअर शोमध्ये भारतीय LCA तेजस विमानाचा अपघात. 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' स्टंट अपघातग्रस्त होण्याचे कारण. 'निगेटिव्ह-जी' म्हणजे काय? ताजे अपडेट्स जाणून घ्या.

पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
दुबई एअर शो २०२५ दरम्यान भारतीय वायुसेनेचे एलसीए तेजस हे हलके लढाऊ विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये हवाई दलाचा पायलट शहीद झाला आहे. युद्धावेळची ॲक्रोबॅटिक अत्यंत धोकादायक हवाई कसरत करताना हे विमान कोसळले आहे.
'निगेटिव्ह-जी' म्हणजेच ग्रॅव्हिटी झिरोपेक्षाही खाली असलेला हा युद्धाभ्यास होता. हा एक अत्यंत कठीण हवाई युद्धाभ्यास आहे. ज्यामध्ये विमान आणि वैमानिकावर नकारात्मक गुरुत्वाकर्षण बल किंवा भारहीनतेची स्थिती निर्माण होते. जेव्हा विमान खूप वेगाने खाली झेपावते, तेव्हा हा स्टंट केला जातो. हा युद्धाभ्यास विमान आणि वैमानिक दोघांवरही सामान्य गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध बळ निर्माण करतो.
जर हा स्टंट व्यवस्थित हाताळला गेला नाही, तर वैमानिकाच्या डोक्यातील रक्त जमा होऊ शकते आणि त्याला तात्पुरती अस्वस्थता किंवा अशक्तपणा येण्याचा धोका असतो. याच कारणामुळे वैमानिकांना या स्टंटसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते.
#WATCH | LCA Tejas part of Indian Air Force flying display performed aerobatics in Dubai Air Show 2025 on November 19, 2025, at Al Maktoum International Airport
— ANI (@ANI) November 21, 2025
An Indian Air Force Tejas aircraft has crashed at the Dubai Air Show 25 today. Further details are being ascertained… pic.twitter.com/OLvji4ixmx
दुबई अपघाताचे प्राथमिक विश्लेषण
प्राथमिक मूल्यांकनानुसार, तेजसने एक लूप युद्धाभ्यास यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर विमान समतल करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच दरम्यान विमानाची उंची अचानक कमी झाली आणि ते जमिनीवर कोसळले. अपघाताच्या वेळी 'तेजस' निगेटिव्ह-जी टर्न घेत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवृत्त झालेल्या मिग-२१ विमानाची जागा घेणारे तेजस हे भारतीय हवाई दलातील सर्वात सुरक्षित लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. गेल्या २४ वर्षांतील तेजस विमानाचा हा केवळ दुसरा अपघात आहे.