शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Lok Sabha Chunav 2024:  'लिहून ठेवा 2024 च्या निवडणुकीत PM मोदींचं सिंहासन हालल्याशिवाय राहणार नाही...' बड्या नेत्याचा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 13:21 IST

"भाजप आमच्या कुटुंबातील सदस्यांना कशा प्रकारे निशाणा बनवत आहे, हे लोक पाहत आहेत."

बिहारचे पर्यावरण मंत्री आणि आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांनी देशाच्या राजकारणासंदर्भात एक मोठी भविष्यवाणी केली आहे. दिल्लीत नरेंद्र मोदी ज्या सिंहासनावर बसले आहेत ते सिंहासन हालल्याशिवाय राहणार नाही, असे तेज प्रताप यादव यांनी म्हटले आहे. मानहानी प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व गेले. यानंतर तेज प्रताप यांनी हे भाष्य केले आहे.

नरेंद्र मोदी यांचे सिंहासन हालणार -तेज प्रताप म्हणाले, '2024 मध्ये आपला केंद्रातून सफाया होणार, हे भाजपला माहीत आहे. मी भविष्यवाणी करत आहे की, 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिंहासन हालणार.' ते पुढे म्हणाले, देशात भाजपने हुकूमशाहीचा पर्याय निवडला आहे. राहुल गांधी यांना ज्या पद्धतीने लोकसभेतून अपात्र घोषित करण्यात आले, ते अयोग्य आहे. 

भाजप सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांमागे लागला आहे. मात्र जनता त्यांना योग्यवेळी उत्तर देईल. भाजप आमच्या कुटुंबातील सदस्यांना कशा प्रकारे निशाणा बनवत आहे, हे लोक पाहत आहेत. ते विरोधकांच्या ऐक्याला घाबरतात, त्यामुळेच विरोधी नेत्यांना निशाणा बनवत आहेत, असेही तेज प्रताप म्हणाले.

काँग्रेस आमदार शकील अहमद म्हणाले, भाजप विरोधकांच्या ऐक्याला घाबरते. 2024 मध्ये ते सत्तेवरून पायउतार होणार, हे त्यांना माहीत आहे. यामुळेच ते राहुल गांधींसारख्या नेत्याला निशाणा बनवत आहेत. 

टॅग्स :Tej Pratap Yadavतेज प्रताप यादवNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस