शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

तीस्ता सेटलवाड यांच्या अटकेस तूर्तास मनाई

By admin | Updated: February 13, 2015 01:14 IST

गुलबर्ग सोसायटीचा निधी कथितरीत्या हडप केल्याप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने एक दिवसाचा दिलासा

अहमदाबाद / नवी दिल्ली: सन २००२ च्या गुजरात दंगलीत उध्वस्त झालेल्या गुलबर्ग सोसायटीचा निधी कथितरीत्या हडप केल्याप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने एक दिवसाचा दिलासा दिला़ गुजरात उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळताच सेटलवाड व त्यांच्या पतीने लगेच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सरन्यायाधीश एच़एल़ दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमक्ष सेटलवाड यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी त्यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्याची विनंती केली़ पोलीस कुठल्याही क्षणी त्यांना अटक करू शकतात़ ही एक असामान्य स्थिती असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले़ यानंतर सर्वोच्च न्यायालयाने संबंधित याचिकेवर उद्या सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले़ तसेच तोपर्यंत सेटलवाड यांच्या अटकेला स्थगिती दिली़आरोपींकडून तपासात सहकार्य मिळत नसल्याने आणि सर्वांनी गुलबर्ग सोसायटीचा निधी खासगी कामांसाठी खर्च केल्याचे प्रथमदृष्ट्या दिसत असल्याचे नमूद करून गुजरात उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर अहमदाबाद पोलिसांनी सेटलवाड व त्यांच्या पतीचा शोध सुरू केला होता़ त्यांचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी मुंबई पोलिसांची मदतही मागण्यात आली होती़ सेटलवाड व त्यांचे पती मुंबईतील जुहू भागात वास्तव्यास आहेत़ गुजरात दंगलीदरम्यान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या गुलबर्ग सोसायटीत एक संग्रहालय उभारण्याच्या इराद्याने कोट्यवधी रुपयांचा निधी उभारण्यात आला होता़ २००६ मध्ये गुलबर्ग सोसायटीत ‘म्यूजियम आॅफ रेजिसटेन्स’ बनविण्याचा निर्णय झाला होता.