महिलांच्या पाठीमागून जायचा आणि...; फॉलोअर्स मिळविण्यासाठी तरुणाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 13:30 IST2025-07-24T13:28:59+5:302025-07-24T13:30:00+5:30

Crime: इन्स्टाग्रामवर झटपट फॉलोअर्स वाढवण्याचा प्रयत्न एका तरुणाच्या अंगलट आला आहे.

Teen Secretly Records Obscene Videos Of Woman and Posts On Instagram | महिलांच्या पाठीमागून जायचा आणि...; फॉलोअर्स मिळविण्यासाठी तरुणाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

महिलांच्या पाठीमागून जायचा आणि...; फॉलोअर्स मिळविण्यासाठी तरुणाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

बंगळुरूमध्ये गुप्तपणे महिलांचे व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याप्रकरणी एका १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. दिलावर हुसेन एमडी, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी इन्स्टाग्रामवर दिलबर जानी-६७ नावाचे अकाउंटवरून महिलांचे व्हिडीओ पोस्ट करायचा आणि बंगळुरू नाईट लाईफ या पेजला टॅग करायचा, असे इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.

दिलावर हा मूळचा मणिपूर येथील रहिवासी असून सध्या कोथनूरमधील बायराठी येथे वास्तव्यास आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलावर फूड डिलिव्हरी एजंट म्हणून काम करतो. त्याने इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला अश्लील असल्याचे पोलिसांना आढळले. त्यानंतर अशोक नगर पोलिसांचे उपनिरीक्षक नबी साब यांनी दिलाविरोधात तक्रार दाखल केली. दिलावर गुप्तपणे महिलांचे व्हिडिओ काढायचा आणि इन्स्टाग्रामवर अपलोड करायचा. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दिलावरने एमजी रोड, ब्रिग्रेड रोज आणि कोरमंगळा यासह बंगळुरूतील वर्दळ असलेल्या परिसरात महिलांचे पाठीमागून व्हिडीओ काढायचा.

या प्रकरणात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, आरोपीने फॉलोअर्स मिळविण्यासाठी महिलांचे व्हिडिओ अपलोड केले. आरोपीने आतापर्यंत १४ महिलांचे व्हिडीओ काढल्याची कबूली दिली. इन्स्टाग्रामवरून हे व्हिडिओ काढून टाकण्याची विनंती करण्यात आली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून लवकरच त्याला न्यायालयात हजर केले जाईल, असे सांगण्यात आले.

Web Title: Teen Secretly Records Obscene Videos Of Woman and Posts On Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.