ऑनलाईन रमीच्या नादात शिक्षिका चोर बनली,बुरखा घालून ८ लाखांवर डल्ला मारला; चेहऱ्यावरील तीळामुळे सापडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 11:42 IST2025-07-24T11:42:02+5:302025-07-24T11:42:35+5:30
अहमदाबादमधील एका नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्य महिलेने ऑनलाइन रमीच्या नादात ८ लाख रुपये चोरले. शिक्षिकेने बुरखा घालून चोरी केली.

ऑनलाईन रमीच्या नादात शिक्षिका चोर बनली,बुरखा घालून ८ लाखांवर डल्ला मारला; चेहऱ्यावरील तीळामुळे सापडली
अहमदाबादमधील मेघनानगर येथील एका नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्याला ८ लाख रुपये चोरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांना या प्रकरणात तिच्या उजव्या डोळ्याजवळील तीळावरून सुगावा लागला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बुरखा घातलेली एक महिला कॉलेजच्या तिजोरीतून चोरून पैसे काढताना दिसत होती आणि तीळामुळे तिची ओळख पटवली.
भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव...
मिळालेली माहिती अशी, त्या महिलेला ऑनलाइन रमीचे इतके व्यसन लागले होते. ती कर्जाच्या जाळ्यात अडकली. या कर्जातून बाहेर पडण्यासाठी आणि खेळत राहण्यासाठी तिने कॉलेजच्या तिजोरीतून पैसे चोरण्याचा मार्ग निवडला. २२ जुलै रोजी सकाळी ६ वाजता तिने तिजोरीतून ५०० रुपयांच्या नोटांचा एक बंडल काढला, यामध्ये एकूण ८ लाख रुपये होते.
सीसीटीव्हीमुळे उघडकीस
सकाळी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना तिजोरी रिकामी आढळली तेव्हा ही बाब उघडकीस आली. त्यांनी ताबडतोब कर्मचाऱ्यांना एकत्र केले आणि चौकशी सुरू केली. उपप्राचार्य, त्यावेळी तिथे उपस्थित होते, जणू काही काहीच घडलेच नाही असं दाखवलं. पण पोलिसांनी रात्रभर सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले आणि त्या तीळाने संपूर्ण रहस्य उघड केले. उपनिरीक्षक आर.एम. चावडा म्हणाले, 'फुटेजमध्ये बुरखा घातलेल्या महिलेच्या उजव्या डोळ्याजवळ तीळ दिसल्यानंतर आम्हाला संशय आला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उपप्राचार्यांकडे चौकशी केली आणि त्यांना व्हिडीओ दाखवला तेव्हा त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.'
पोलिसांनी तिच्या शाहीबाग येथील घरातून २.३६ लाख रुपये रोख जप्त केले. उर्वरित ५.६४ लाख रुपये रात्रीतून त्याच्या ऑनलाइन गेमिंग वॉलेटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. पोलिसांनी ते वॉलेट गोठवले आहे आणि उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे.