शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

नक्षलवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवा, मोदींचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2018 3:58 PM

छत्तीसगडमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जगदलपूर येथे जनतेला संबोधित केलं.

छत्तीसगड - छत्तीसगढ येथे विधानसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेसला लक्ष्य केलं. सबका साथ सबका विकास या धोरणानुसार भाजपा देशात काम करत आहे. समाजातील सर्वच घटकांचा विकास करणं भाजपाचे ध्येय आहे. देशात माझा-तुझा असा खेळ अजिबात चालणार नाही, असे मोदींनी जगदलपूर येथील भाषणात म्हटले. तसेच यापूर्वीचं सरकार जातीपातीचे राजकारण करत होते. तसेच नक्षली कारवायांचे समर्थन करणाऱ्या क्राँग्रेसला धडा शिकवा, असे आवाहनही मोदींनी केलं आहे. 

छत्तीसगडमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जगदलपूर येथे जनतेला संबोधित केलं. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमनसिंग यांच्यासह भाजपा नेते व्यासपीठावर उपस्थित होते. येथील प्रचारसभेत बोलताना मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं. काँग्रेस पक्ष नेहमीच दलित, पीडित, शोषित, वंचित आणि गरिबांना आपली वोट बँक मानते. या वर्गाकडे माणूस म्हणून काँग्रेस कधीच पाहात नसल्याचा आरोपही मोदींनी केला. याउलट भाजपा सरकार नेहमीच जनतेच्या पाठीशी आहे. आम्ही आपला-परका, जातीभेद, हिंदू-मुस्ली, जवान-वृद्ध असा भेदभाव कधीही केला नाही. तर, सर्वांना सोबत घेऊनच आम्हाला विकास घडवायचा असल्याचे मोदींनी म्हटले. तसेच छत्तीसगडमधील नक्षलवादी कारवायांवरही मोदींनी भाष्य केलं. शहरी नक्षलवादी लोक स्वत: आरामदायी जीवन जगतात. मात्र, गरिब आणि आदिवासी लोकांच्या हातात बंदुक देऊन आपला स्वार्थ साधतात, असे मोदींनी सांगितले. तसेच नक्षलवाद्यांनी एका पत्रकाराची निर्घृण हत्या केली. तो पत्रकार तर त्याचे काम करण्यासाठी आला होता, पण नक्षलींनी त्याला ठार मारले. मात्र, काँग्रेसकडून अशा नक्षलवाद्यांच समर्थन करण्यात येतं. या नक्षलवाद्यांना काँग्रेस क्रांतिकारी म्हणते, असा आरोपही मोदींनी केला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीChhattisgarhछत्तीसगडcongressकाँग्रेसnaxaliteनक्षलवादी