शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

TDP, JDU नं भाजपचं टेन्शन वाढवलं, आता JDS ला काय हवं? खुद्द एचडी कुमारस्वामींनीच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 11:49 IST

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेण्यापूर्वीच राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चांना उधान आले आहे. चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टी (TDP) आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल यूनाइटेडने (JDU) काही महत्वाची मंत्रालये मागितल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यातच आता 'जेडीएस'नेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

देशभरात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA ला बहुमत मिळाले आहे. मात्र, यावेळी भाजपची इतर सहकारी पक्षांवरील निर्भरता वाढली आहे. कारण यावेळी भाजपला स्वबळावर बहुमतापासून (२७२) दूर राहावे लागले आहे. खरे तर भाजपला 2014 नंतर पहिल्यांदाच एकट्याच्या बळावर बहुमत मिळालेले नाही.

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेण्यापूर्वीच राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चांना उधान आले आहे. चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टी (TDP) आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल यूनाइटेडने (JDU) काही महत्वाची मंत्रालये मागितल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यातच आता 'जेडीएस'नेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अशी आहे जेडीएसची भूमिका? -जेडीएस नेते तथा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी, "आम्ही नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत. माझ्या शिवाय संपूर्ण देशालाच पंतप्रधान मोदींकडून मोठ्या अपेक्षा आहेत," असे म्हटले आहे. एचडी कुमारस्वामी हे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. यावेळी, युतीत सहभागी असलेले विविध पक्ष, विविध प्रकारच्या मागण्या करत आहेत. यासंदर्भात आपले काय म्हणणे आहे? असा प्रश्न केला असता, कुमारस्वामी म्हणाले, "काहीही मागणी नाही, देशाला स्थिर सरकार हवे आहे." 

खरे तर एनडीएकडे 293 खासदार आहेत. हा आकडा 543 सदस्यांच्या लोकसभेसाठी आवश्यक असलेल्या 272 पेक्षा अधिक आहे. एकट्या भाजपकडे 240 जागा आहेत. तसेच, एनडीएतील टीडीपीकडे 16, तर जेडीयूकडे 12 जागा आहेत. ज्या अत्यंत आवश्यक आहेत. याशिवाय, जेडीएसकडे 2 खासदार आहेत आणि काही इतर.

काय आहे टीडीपीची मागणी? -माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, टीडीपीने 6 मंत्रालये मागितली आहेत. ते 5 वरही राजी होण्यास तयार आहेत. याशिवाय, त्यांना लोकसभा अध्यपदही हवे आहे. 

जेडीयूला काय हवं? - जेडीयूच्या एका नेत्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, पक्षाला तीन मंत्रालये हवी आहेत. याशिवाय, नितीश कुमार रेल्वे, ग्रामीण विकास आणि कृषी यासारख्या मोठ्या मंत्रालयांची मागणी करू शकतात, असेही पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीNitish Kumarनितीश कुमारChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू