Taylor Swift, PM Narendra Modi : टेलर स्विफ्ट ट्विटरवरील सर्वात प्रभावशाली व्यक्ती, पंतप्रधान मोदी दुसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 12:17 AM2021-11-10T00:17:58+5:302021-11-10T00:18:24+5:30

Taylor Swift Becomes Most Influential Person : अमेरिकन गायिका टेलर स्विफ्ट ही ट्विटरवरील सर्वात प्रभावशाली ५० व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर पंतप्रधान मोदींना दुसरा क्रमांक देण्यात आला आहे.

taylor swift becomes most influential person on twitter pm narendra modi comes second know full list here | Taylor Swift, PM Narendra Modi : टेलर स्विफ्ट ट्विटरवरील सर्वात प्रभावशाली व्यक्ती, पंतप्रधान मोदी दुसऱ्या क्रमांकावर

Taylor Swift, PM Narendra Modi : टेलर स्विफ्ट ट्विटरवरील सर्वात प्रभावशाली व्यक्ती, पंतप्रधान मोदी दुसऱ्या क्रमांकावर

Next

अमेरिकन गायिका टेल स्विफ्ट (Taylor Swift) हिला ट्विटरवरील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पहिलं स्थान देण्यात आलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना या यादीत दुसरं स्थान देण्यात आलं आहे. कंझ्युमर इंटेलिजन्स कंपनी ब्रँडवॉचद्वारे करण्यात आलेल्या वार्षिक रिसर्चनुसार टेलर स्विफ्ट ही सर्वात प्रभावी व्यक्तीच्या रूपात समोर आली आहे.

या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावाचाही समावेश करण्यात आले. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरनं अमेरिकन अभिनेता ड्वेन जॉन्सन, लियोनार्डो डी कॅप्रियो आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्यासारख्या व्यक्तींनाही मागे टाकलं आहे.

... म्हणून सचिनच्या नावाचा समावेश
सचिन दुर्बल घटकांसाठी सातत्यानं आवाज उठवत असल्याचं कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं. याशिवाय अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही तो आपलं मत व्यक्त करत आहे. याशिवाय, त्याच्या सहयोगी ब्रँडच्या संबंधित प्रभावशाली मोहिमेमुळे त्याच्या चाहत्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. यामुळे त्याला यादीत ३५ वा क्रमांक देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. सचिन हा राज्यसभेचा खासदारदेखील होता. याशिवाय गेल्या एका दशकापासून तो युनिसेफशी जोडलेला आहे. त्यानं ग्रामीण आणि शहरी भारत दोन्ही ठिकाणी आरोग्य, शिक्षण आणि खेळाच्या क्षेत्रातही योगदान दिल्याचं म्हटलं आहे.

या यादीत निक जोन्स, निकी मिनाज, बेयॉन्से, ल्युईस टॉमलिंसन, ब्रुनो मार्स, लियाम पायने आणि ताकाफुमी होरी यांच्या नावांचाही समावेश करण्यात आला आहे. या यादीत ६१ टक्के पुरूष तर ३९ टक्के महिलांचा समावेश आहे. यादीत असलेल्या नावांपैकी ६७ लोक हे अमेरिकेतील आहेत, तर १३ टक्के लोक हे ब्राझीलमधील आहेत.

Web Title: taylor swift becomes most influential person on twitter pm narendra modi comes second know full list here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.