शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

नोटमंदी: साठेबाजांवर छापे, रिझर्व्ह बँकेनं रोख रकमेचा पुरवठा वाढवला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 9:30 AM

आंध्र प्रदेश, तेलंगणामधील मोठे कंत्राटदार रडारवर

नवी दिल्ली: देशात निर्माण झालेली चलन टंचाई दूर करण्यासाठी आता अनेक आघाड्यांवर प्रयत्न सुरु झाले आहेत. एकीकडे कर यंत्रणांनी रोख रकमेचा साठा करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. तर दुसरीकडे रिझर्व्ह बँकेनं रोख रकमेचा पुरवठा वाढवला आहे. बुधवारी कर्नाटक, आंध्र प्रदेशात 30 ते 35 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. तर बिहारमधील एटीएम नेटवर्कच्या माध्यमातून 800 ते 900 कोटी रुपये मूल्याच्या नोटा बाजारात आणल्या गेल्या आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील रोकड टंचाईची समस्या मोठी आहे. याठिकाणी मोठ्या कंत्राटदारांची भूमिका संशयास्पद असल्यानं कर यंत्रणांकडून अनेकांची चौकशी होण्याची शक्यता आहे.  छापेमारीतून आतापर्यंत मोठी रोख रक्कम हाती लागलेली नाही. मात्र येणाऱ्या दिवसांमध्ये कर यंत्रणांकडून कारवाईला व्यापक रुप देण्यात येणार आहे. देशाच्या अनेक भागांमधील चलन टंचाईमागे दोन हजारांच्या नोटांची साठेबाजी हे प्रमुख कारण आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड काढणारे आता यंत्रणांच्या रडारवर असणार आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील कंत्राटदारांचे व्यवहारदेखील संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यामुळेच या व्यवहारांचा तपासदेखील संबंधित यंत्रणांकडून केला जाणार आहे. या दोन्ही राज्यांमधील अनेक मोठे कंत्राटदार लहान कंत्राटदारांना धनादेश देत आहेत. प्रकल्पांच्या नावाखाली हे धनादेश दिले जात असून त्याच्या आधारे लहान कंत्राटदारांकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढली जात आहे. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी कोणतीही कामं झाली नसताना धनादेश दिले जात आहेत. 'काही व्यवहारांमध्ये खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे जितकी रक्कम कंत्राटदारांनी बँकेतून काढली आहे, तितक्या रकमेची कामं झालेली नाहीत. अनेक योजनांतर्गत येणारी कामं झालेली नाहीत. मात्र त्यांचा खर्च दाखवण्यात आला आहे,' अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या भागातील रोख रकमेच्या साठ्याशी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील आगामी निवडणुकांशी संबंध आहे का, याचाही तपास सध्या सुरू आहे.  

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक