करवसुलीने महापालिकेला तारले

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:42+5:302015-06-15T21:29:42+5:30

सोलापूर : मिळकत कर वसुली वाढल्याने महापालिका कर्मचार्‍यांचा मे महिन्याच्या पगाराचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

Tax evasion saved municipal corporation | करवसुलीने महापालिकेला तारले

करवसुलीने महापालिकेला तारले

लापूर : मिळकत कर वसुली वाढल्याने महापालिका कर्मचार्‍यांचा मे महिन्याच्या पगाराचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
गेली दोन?तीन महिने महापालिका आर्थिक संकटातून जात आहे. दरमहा कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होत आहे. गेल्या आठवड्यात मिळकत कराची वसुली सुमारे 8 कोटींपर्यंत झाल्याने पगारीचा प्रश्न सुटला आहे. दररोज मिळकत कर वसुली चांगली होत आहे. सोमवारी हद्दवाढ भागातून 40 लाख, शहरी भागातून 60 लाख आणि गलिच्छ वस्ती सुधारणा विभागातून 1 लाख वसुली जमा झाली.
एलबीटी थकबाकी वसुलीला मात्र म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. राज्य शासनाने जाहीर केलेल्या योजनेला व्यापार्‍यांनी प्रतिसाद दिलेला नाही. मुळात महापालिकेकडे नेमकी थकबाकी किती याची आकडेवारी नाही. ज्यांनी विवरणपत्र भरले अशा व्यापार्‍यांची महापालिकेकडे यादी आहे. मात्र अद्याप ज्यांनी तीन वर्षापासून कर भरलेला नाही अशा व्यापार्‍यांची नावे शोधणे महापालिकेला आव्हानात्मक ठरले आहे. महापालिकेच्या एलबीटी विभागाने आयकर विभागाकडून मागविलेल्या यादीवरून कामचलाऊ धोरण स्वीकारले आहे. या यादीत दुबार नावे आहेत. त्यामुळे हे काम तातडीने करून घेण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या योजनेत प्रामाणिक व्यापार्‍यांवर मात्र अन्याय झाला आहे. व्याज, दंडासह पूर्णपणे एलबीटी भरलेल्यांना परतावा मिळणार नाही.

Web Title: Tax evasion saved municipal corporation