ताशी नामग्याल यांचा मृत्यू; त्यांनीच कारगीलमध्ये पाकिस्तानी सैन्य घुसल्याची माहिती दिली होती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 08:43 IST2024-12-21T08:32:42+5:302024-12-21T08:43:01+5:30
ताशी नामग्याल यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी वेळेवर दिलेल्या माहितीमुळे भारतीय सैन्याला मोठा फायदा झाला आहे.

ताशी नामग्याल यांचा मृत्यू; त्यांनीच कारगीलमध्ये पाकिस्तानी सैन्य घुसल्याची माहिती दिली होती
१९९९ मध्ये कारगील युद्ध झाले. या युद्धाच्या आधी पाकिस्तानी सैनिकांनी वेष बदलून घुसखोरी करण्यास सुरुवात केली होती. या घुसखोरीची माहिती भारतीय सैनिकांना मेंढपाळ असलेले ताशी नामग्याल यांनी दिली होती. या मेंढपाळाने वेळीच माहिती दिल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. या महितीमुळे भारतीय सैन्याला मोठा फायदा झाला होता. पाकिस्तानच्या घुसखोरीबद्दल भारतीय सैन्याला सर्वात पहिल्यांदा सतर्क करणारे मेंढपाळ ताशी नामग्याल यांचा आर्यन व्हॅलीमध्ये मृत्यू झाला. ते ५८ वर्षांचे होते. नामग्याल यांनी या वर्षाच्या सुरुवातीला द्रास येथे २५ व्या कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित सोहळ्यात त्यांची मुलगी सेरिंग डोलकर हिच्यासोबत हजेरी लावली होती. ताशी नामग्याल यांची मुलगी पेशाने शिक्षिका आहे.
‘आरे’तील आणखी झाडे तोडण्याचा विचार आहे का? सर्वोच्च न्यायालयाची सरकारला विचारणा
भारतीय लष्कराच्या लेह स्थित 'फायर अँड फ्युरी कॉर्प्स'ने त्यांच्या सोशल मीडिया हँडल 'एक्स'वर लिहिले, 'आम्ही ताशी नामग्याल यांना त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करतो. देशभक्त आता आपल्यात नाही. लडाखचे शूर- तुमच्या आत्म्याला शांती लाभो. या दु:खाच्या प्रसंगी, आम्ही शोकसंतप्त कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. नामग्याल यांना श्रद्धांजली अर्पण करताना, भारतीय सैन्याने १९९९ मध्ये ऑपरेशन विजय दरम्यान देशासाठी त्यांच्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकला आणि त्यांचे नाव इतिहासात 'सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल' असंही लिहिले आहे.
ताशी नामग्याल यांचे लडाखच्या आर्यन व्हॅलीमधील गरखोनमध्ये निधन झाले. १९९९ मध्ये, मे महिन्याच्या सुरुवातीला, ताशी नामग्याल यांनी आपल्या हरवलेल्या याकच्या शोधात बटालिक पर्वत रांगेकडे कूच केली. येथे त्यांनी पठाणी पोशाखात काही लोक बंकर खोदताना पाहिले, ते सिव्हिल ड्रेसमध्ये पाकिस्तानी सैनिक होते. परिस्थितीचे गांभीर्य समजून त्यांनी तत्काळ भारतीय लष्कराला याची माहिती दिली.
A PATRIOT PASSES
— @firefurycorps_IA (@firefurycorps) December 20, 2024
Braveheart of Ladakh - Rest in Peace
Fire and Fury Corps pays tribute to Mr Tashi Namgyal on his sudden demise. His invaluable contribution to the nation during Op Vijay 1999 shall remain etched in golden letters. We offer deep condolences to the bereaved… pic.twitter.com/jmtyHUHNfB
ताशी नामग्याल यांनी दिलेल्या या वेळेवर माहितीने भारताच्या लष्करी प्रत्युत्तराला प्रत्युत्तर देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. ३ मे ते २६ जुलै १९९९ दरम्यान झालेल्या कारगिल युद्धात, भारतीय सैन्याने त्वरीत जमवाजमव करून श्रीनगर-लेह महामार्ग रोखण्याचा पाकिस्तानचा गुप्त मोहीम हाणून पाडली. या युद्धात भारताच्या विजयात ताशी नामग्याल यांच्या सतर्कतेचा महत्त्वाचा वाटा होता. कारगिल युद्धातील त्यांच्या भूमिकेसाठी भारतीय सैन्याने ताशी यांचे शूर आणि देशभक्त मेंढपाळ म्हणून वर्णन केले आहे.