तंत्र विद्यामध्ये तज्ज्ञ, अनेक YouTubers सोबत संबंध...; पाकिस्तानला भेट देणाऱ्या गुप्तहेर कासिमची संपूर्ण कुंडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 16:58 IST2025-05-31T16:54:41+5:302025-05-31T16:58:43+5:30
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली कासिम नावाच्या एका तरुणाला अटक केली आहे.

तंत्र विद्यामध्ये तज्ज्ञ, अनेक YouTubers सोबत संबंध...; पाकिस्तानला भेट देणाऱ्या गुप्तहेर कासिमची संपूर्ण कुंडली
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली स्पेशल सेलने मेवात भागातील कासिम नावाच्या तरुणाला अटक केली. तो भारतीय सैन्याबद्दल इतर माहिती आयएसआयला देत होत, या बदल्यात त्याला मोठी रक्कम मिळत होती, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
आयएसआयच्या सूचनेनंतर तो ऑगस्ट २०२४ आणि गेल्या मार्च महिन्यामध्ये दोनवेळ लाहोरला गेला होता. तो तरुण पाकिस्तानमध्ये तीन महिने थांबला होता, तेव्हापासून तो केंद्रीय एजन्सीच्या रडारवर होता. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय एजन्सीने पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या-येणाऱ्यांची चौकशी केली.
अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रमोद सिंह कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कासिम हा राजस्थानमधील भरतपूरचा रहिवासी आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, सेलला माहिती मिळाली होती की आयएसआय आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था हेरगिरीसाठी भारतीय मोबाईल नंबर वापरत आहेत.
त्यानंतर तपास सुरू झाला. कासिमचा भाऊही आयएसआयसाठी हेरगिरी करत होता. पोलिस त्याचाही शोध घेत आहेत.
कासिम पाकिस्तानात गेला होता आणि त्याने आयएसआयकडून गुप्तचर माहिती गोळा करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्याच्याकडून दोन मोबाईल फोन, १० हून अधिक सिम कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत, याची चौकशी सुरू आहे.
भरतपूरमध्ये तांत्रिक विद्याचं काम करत होता
तो ज्यावेळी पाकिस्तानला गेला होता त्यावेळी त्याने अनेक भारतीय सिमकार्ड पीआयओ अधिकाऱ्यांना दिले. हे सिमकार्ड गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी वापरले जात होते. कासिमला चौकशीसाठी रिमांडवर घेण्यात आले आहे. एजन्सी त्याची चौकशी करत आहेत. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर केंद्रीय एजन्सींनी भारतात राहणाऱ्या आणि पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या लोकांविरुद्ध दक्षता वाढवली आहे.