शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

CoronaVirus News : भयावह! कोरोनापासून वाचण्यासाठी 'त्याने' केला भयंकर उपाय; खाल्ला कच्चा विषारी साप अन्

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 7:40 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनापासून बचाव करण्यासाठी चक्क विषारी साप चावून खाल्ल्याची किळसवाणी घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,75,55,457 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,86,364 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,660 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,18,895 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अनेक अफवा देखील पसरवल्या जात आहेत. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना घडली आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी एका व्यक्तीने एक विचित्रच प्रकार केला आहे. 

कोरोनापासून बचाव करण्यासाठी चक्क विषारी साप चावून खाल्ल्याची किळसवाणी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातील पेरुमलपट्टीच्या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. साप खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरसपासून आपला बचाव होणार असल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. वाडिवेल असं या व्यक्तीचं नाव असून तो पेरुमलपट्टीचा रहिवासी आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून एकच खळबळ उडाली आहे. साप खाण्याऱ्या या व्यक्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. 

वाडिवेल याने शेतात एक साप पकडला, त्याला मारलं आणि कोरोनावरील उपचार असल्याचं सांगत तो कच्चा खाल्ला. त्यावेळी त्याच्या मित्राने त्याचा साप खातानाचा एक व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. कोरोनाबाबत व्हिडीओच्या माध्यमातून असा विचित्र सल्ला देणं त्याला आता चांगलंच महागात पडलं आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.वडीपट्टीमध्ये गुरुवारी त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला 7,500 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयंकर! कोरोनाचा नवा साईड इफेक्ट; आकार वाढून तोंडाबाहेर लटकतेय रुग्णाची जीभ

कोरोनावर मात केल्यानंतरही रुग्णाच्या शरीरात काही साईड इफेक्ट्स हे पाहायला मिळत आहेत. यामध्ये आता जीभेला सूज येत असल्याचं समोर आलं आहे. फ्लोरिडा येथे राहणाऱ्या अँथोनी यांना गेल्या वर्षी जुलैमध्ये कोरोनाची लागण झाली. त्यांनी कोरोनावर मात देखील केली पण त्यानंतरही त्यांच्या जीभेला सूज आली. ती सूज एवढी वाढली की जीभ बाहेर लटकायला लागली. जीभेला सूज येण्याच्या समस्येला Macroglossia असं म्हणतात. यामध्ये जीभेला सूज येते आणि तिचा आकार देखील वाढू लागतो. कोरोनावर रिसर्च करणारे डॉ. जेम्स मेलविल्ले यांनी आतापर्यंत त्यांच्याकडे याच्या 9 केसेस आल्याचं म्हटलं आहे. डॉ. जेम्स मेलविल्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अँथोनी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. उपचारानंतर त्याची जीभ इतकी सुजली की त्याला खाणं-पिणं आणि बोलणंही शक्य होत नाही. तसेच ती बाहेर आली आहे. ड़ॉक्टरांनी सर्जरी करून ती नॉर्मल साईज एवढी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsnakeसापTamilnaduतामिळनाडू