सालेम: आजकाल कार डॅशकॅम हे महत्वाचे डिव्हाईस बनले आहे. याद्वारे तुम्ही कार चालवताना समोरील आणि मागील बाजूची रेकॉर्डिंग करू शकता. कारचा अपघात झाल्यावर कुणाची चुकी आहे, हे डॅशकॅमच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमधून कळते. तामिळ तामिळनाडूच्या सालेम जिल्ह्यातून अपघाताचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा अपघात कारमध्ये लावलेल्या डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झाला.
या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्या तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारच्या डॅशकॅममध्ये ही संपूर्ण घटना रेकॉर्ड झाली. यामध्ये संपूर्ण चुकी त्या बाईकस्वाराची होती. कारमध्ये डॅशकॅम नसता, तर कारचालकाची चुकी असल्याचे सर्वांना वाटले असते.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये कार एडाप्पाडी-मगुडांचवडी मार्गावरील एक कार पूल ओलांडताना दिसते. यावेळी समोरुन एक भरधाव दुचाकीस्वार येतो अन् कारला थेट समोर आदळतो. हा अपघात इतका भीषण होता की, बाईकचे तुकडे झाले. बाईकस्वारही काही फूट हवेत उडून कारवर आदळला. या अपघातात बाईकस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना ६ जुलैची असल्याचे सांगितले जात आहे.