Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 13:10 IST2025-09-29T13:08:23+5:302025-09-29T13:10:24+5:30
Tamil Nadu Stampede: अभिनेता थलपती विजयच्या रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ३९ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. या घटनेत आई गमावलेल्या महिलेने तिचं दुःख व्यक्त केलं.

Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
तामिळनाडूतील करूर येथील अभिनेता थलपती विजयच्या रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ३९ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेत आई गमावलेल्या एका महिलेने तिचं दुःख व्यक्त केलं. जमावाने महिलेच्या डोळ्यासमोर आईला चिरडलं. महेश्वरी असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. "मी आणि माझी बहीण विजयच्या गाडीजवळ पडलो आणि माझी आई मला वाचवण्यासाठी आली, पण ती गर्दीत अडकली होती.
"विजयच्या गाडीपर्यंत पोहोचण्यासाठी बरेच लोक धावले होते. मला श्वास घेता येत नव्हता आणि बाहेर पडण्यासाठी मला एक तासापेक्षा जास्त वेळ लागला. मी माझे बूट काढले आणि कसं तरी धक्का देऊन स्वत:ला बाहेर काढण्यात यशस्वी झाले. माझ्या डोळ्यांसमोर जमावाने माझ्या आईला चिरडलं. मी अनेक वेळा मदतीसाठी हाक मारली, पण कोणीही माझ्या मदतीला आलं नाही" असं महिलेने म्हटलं आहे.
“आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
"अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
"गर्दीने माझ्या आईलाही सोबत फरफटत नेलं"
महेश्वरी यांचा मुलगा प्रशांत याने दिलेल्या माहितीनुसार, "शनिवारी (२७ सप्टेंबर २०२५) माझी आई मंदिरात गेली होती. मंदिरातून परतताना तिला अभिनेता थलपती विजयला पाहण्यासाठी थोडा वेळ थांबायचं होतं. दुर्दैवाने गर्दी जास्त असल्याने चेंगराचेंगरी झाली. सर्वजण पुढे जाऊ लागले आणि गर्दीने माझ्या आईलाही सोबत फरफटत नेलं. माझी बहीण आणि तिचा मुलगा गर्दीत अडकले."
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
"आईशिवाय आमचं घर आता रिकामं"
"जेव्हा माझ्या आईने बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती स्वतः चिरडली गेली आणि मृत्यू झाला. आमच्या आईशिवाय आमचं घर आता रिकामं आहे. दुसऱ्यांचा जीव वाचवण्याच्या नादात तिने आपला जीव गमावला. आम्हाला आशा आहे की भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी चांगल्या व्यवस्था केल्या जातील." या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.