तामिळनाडूत मंत्र्याने मंदिरात केला डान्स; व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 22:42 IST2018-11-05T22:33:04+5:302018-11-05T22:42:58+5:30
तामिळनाडूमधील एका मंत्र्याने मंदिर परिसरात डान्स केला. एस.पी. वेलुमणी असे या मंत्र्याचे नाव असून त्यांनी केलेल्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरला आहे.

तामिळनाडूत मंत्र्याने मंदिरात केला डान्स; व्हिडिओ व्हायरल
कोईम्बतूर : तामिळनाडूमधील एका मंत्र्याने मंदिर परिसरात डान्स केला. एस.पी. वेलुमणी असे या मंत्र्याचे नाव असून त्यांनी केलेल्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरला आहे.
तामिळनाडूमधील इरोडे जिल्ह्यातील मंदिरात एका धार्मिक कार्यक्रमासाठी एस.पी.वेलुमणी आले होते. यावेळी मंदिरात इतर लोकांसह एस.पी. वेलुमणी यांनी डान्स केला. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ उपस्थितीतांनी शूट केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
#WATCH Tamil Nadu Minister SP Velumani(first from left) dances during a temple festival in Coimbatore's Kaikolapalayam yesterday pic.twitter.com/9v1Pa5ut8c
— ANI (@ANI) November 5, 2018
दरम्यान, एस.पी. वेलुमणी हे तामिळनाडूचे नागरी प्रशासन व ग्रामीण विकास मंत्री आहेत.