शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

आधी म्हटलं “हिंदी भाषिक आमच्याकडे पाणीपुरी विकतात,” आता तामिळनाडूच्या मंत्र्याची सारवासारव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 8:35 AM

Tamil Nadu minister Ponmudy : तामिळनाडूच्या उच्च शिक्षण मंत्री पोनमुडी यांनीही हिंदी भाषेच्या वादात उडी घेतली आहे.

Tamil Nadu minister Ponmudy : तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री पोनमुडी यांनी हिंदी भाषेबाबत वादग्रस्त विधान केले आहे. इंग्रजी ही भाषा म्हणून हिंदीपेक्षा अधिक मौल्यवान आहे, असे ते म्हणाले. तसेच, हिंदी ही ऐच्छिक असली पाहिजे, मात्र अनिवार्य नसावी असं सांगत हिंदी बोलणारे आमच्याकडे पाणीपुरी विकत असल्याचं वक्तव्य पोनमुडी यांनी केलं होतं. दरम्यान, आता त्यांनी आपल्या वक्तव्यावरून सारवासारव केली आहे.

“आपलं वक्तव्य उत्तरेकडील राज्यांमध्ये नोकऱ्यांमध्ये असलेल्या कमतरतेसंदर्भात होतं. तामिळनाडूतील लोक उत्तरेकडील राज्यात जाऊन काम करतात. उत्तरेकडील राज्यांमध्ये काम उपलब्ध नसल्याने उत्तरेकडील वेगवेगळे लोक येथे येऊन काम करतात या अर्थाने मी हे बोललो,” असं स्पष्टीकरण पोनमुडी यांनी आपल्या वक्तव्यावर दिलं. तामिळनाडूच्या उच्च शिक्षण मंत्री पोनमुडी यांनीही हिंदी भाषेच्या वादात उडी घेतली आहे. भारथिअर विद्यापीठ कोईम्बतूर येथे शुक्रवारी दीक्षांत समारंभात पोनमुडी यांनी संबोधित केलं. यावेळी भाषा म्हणून इंग्रजी ही हिंदीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. हिंदी भाषिक लोक नोकऱ्यांमध्ये गुंतलेले आहेत. कोईम्बतूरमध्ये हिंदी भाषिक पाणीपुरी विकत आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं.

काय म्हणाले होते पोनमुडी?दरम्यान, पोनमुडी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील फायदेशीर पैलू लागू करण्याचे आश्वासन दिलं. परंतु राज्य सरकार केवळ दोन-भाषा प्रणाली लागू करण्याचा निर्धार असल्याचा दावा केला. दीक्षांत समारंभात तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांच्यासोबत व्यासपीठ शेअर करताना इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून आधीच शिकविली जात असताना हिंदी का शिकली पाहिजे, असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू