तमिळनाडू लोकसभा निवडणूक निकाल 2019: तामिळनाडूत AIADMK आणि DMK यांच्यात चुरस पाहायला मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 08:34 AM2019-05-23T08:34:30+5:302019-05-23T10:48:41+5:30

Tamil Nadu Lok Sabha Election Results Live Vote Counting:: एम. करुणानिधी आणि जयललिता यांच्या निधनामुळे या लोकसभा निवडणुकीद्वारे भाजपा दक्षिण भारतात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.

Tamil Nadu Lok Sabha Election 2019 Result: Tamil Nadu Lok Sabha Election 2019 Result : In first fight without Jayalalthiaa, Karunanidhi, big test for AIADMK, DMK | तमिळनाडू लोकसभा निवडणूक निकाल 2019: तामिळनाडूत AIADMK आणि DMK यांच्यात चुरस पाहायला मिळणार

तमिळनाडू लोकसभा निवडणूक निकाल 2019: तामिळनाडूत AIADMK आणि DMK यांच्यात चुरस पाहायला मिळणार

Next

चेन्नई : तामिळनाडूत एम. करुणानिधी आणि जयललिता या दोन दिग्गज नेत्यांच्या निधनानंतर राज्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी निवडणूक होत आहे. गेल्या निवडणुकीत जयललिता यांच्या ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमने (एआयएडीएमके) 39 पैकी 37 जागांवर विजय मिळवत आपला झेंडा फडकवला होता. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एआयएडीएमकेला शह देण्यासाठी एम.करुणानिधींची द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) पार्टी  संपूर्ण ताकदीनीशी रिंगणात उतरली आहे.

सध्या राज्यातदेखील एआयएडीएमकेची सत्ता असून, त्याखालोखाल राज्यात डीएमकेला जनाधार आहे. मात्र, जयललिता यांच्या निधनानंतर डीआयडीएमकेमधील बेदिली स्पष्टपणे समोर आली होती. त्यामुळे डीएमके राज्यात वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. एम. करुणानिधींच्या निधनानंतर डीएमकेची सुत्रं हाती घेतलेल्या स्टॅलिन यांनी यंदाच्या निवडणुकीत तगडे आव्हान देणार असल्याचे दिसून येते.  याशिवाय राज्यात 22 जागांवर विधानसभेची पोटनिवडणुकीचा निकाल आहे. या पोटनिवडणुकीच्या निकालावर काठावरचे बहुमत असलेल्या राज्यातील डीआयडीएमके सरकारचे भवितव्यही ठरणार आहे. 

दरम्यान, आतापर्यंत तामिळनाडूत प्रादेशिक पक्षांचंच वर्चस्व आहे. मात्र, एम. करुणानिधी आणि जयललिता यांच्या निधनामुळे या लोकसभा निवडणुकीद्वारेभाजपा दक्षिण भारतात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाने  एआयएडीएमकेसोबत युती केली असून चार जागांवर आपले उमेदावर रिंगणार उतरविले आहेत. तर एआयएडीएमकेचे 20 जागांवर उमेदवार निवडणूक लढत आहे. बाकीच्या 19 जागा सहयोगी भाजपासह, पीएमके आणि डीडीएमके यांना दिल्या आहेत. दुसरीकडे, डीएमके सुद्धा फक्त 20 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर जागा बाकीच्या सहयोगी पक्ष काँग्रेस 9, लेफ्ट 10 आणि इतर घटक पक्षांना दिल्या आहेत.

Web Title: Tamil Nadu Lok Sabha Election 2019 Result: Tamil Nadu Lok Sabha Election 2019 Result : In first fight without Jayalalthiaa, Karunanidhi, big test for AIADMK, DMK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.