शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नमो नम:! शेतकऱ्यानं 1 लाख रुपये खर्चून उभारलं नरेंद्र मोदींचं मंदिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 16:06 IST

शेतकऱ्याने आपल्या शेतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधले आहे.

नवी दिल्ली: नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना सुरु केल्यानंतर शेतकऱ्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा झाल्यामुळे तामिळनाडूमधील पी. शंकर या शेतकऱ्याने आपल्या शेतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधले आहे. नरेंद्र मोदींच्या या निर्णयाबद्दल त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी शेतामध्ये मंदिर बांधलं असल्याचे पी. शंकर यांनी सांगितले. 

पी. शंकर यांनी नरेंद्र मोदींचे मंदीर उभारण्यासाठी 1 लाख 20 हजारांचा खर्च केला असल्याचे सांगितले. नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न विचारल्यानंतर नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा फायदा झाला. तसेच नरेंद्र मोदी यांनी कृषी सन्मान योजनेची घोषणा केल्यानंतर मला खूप झाला. यानंतर मी त्यांचे मंदीर बांधण्याचं ठरवलं होतं. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी निवडून यावे यासाठी लोकसभा निवडणुकीच्या आधीच या मंदिराचे बांधकाम केलं असल्याचे पी. शंकर यांनी सांगितले. 

तामिळनाडूमधील इराकुडी गावामध्ये 'नमो मंदीर' या नावाने नरेंद्र मोदी यांचे मंदिर प्रसिद्ध आहे. तसेच आजूबाजूच्या गावामधील लोकं देखील आता पी. शंकर यांनी बांधलेल्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी येतात. मी या मंदिरामध्ये पुजा करण्यासाठी एक पुजारी ठेवण्याचा विचार करत आहे. मात्र त्यासाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद होईपर्यंत मी स्वत: पुजा करत असल्याचे पी. शंकर यांनी सांगितले. तसेच नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या योजनांतर्गत मला 2000 रुपये, गॅस जोडणी व शौचालय देखील बांधून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. 

स्थानिक भाजपाचे नेत्यांना या मंदिराबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पी. शंकर यांना भाजपा पक्षात प्रवेश करुन देशहिताचे काम करण्याचे आवाहन केले. यानंतर पी. शंकर यांनी आवाहन स्वीकारत पक्षासाठी काम करण्याची तयारी दर्शवली आहे. 

 पी. शंकर मंदिरात नरेंद्र मोदी यांची धातूची मुर्ती उभारणार होते. मात्र आधीच मंदिर उभारण्यासाठी लाखांचा खर्च झाल्याने मी दोन फूट सिमेंटची मुर्ती बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगतिले. या मंदिरात महात्मा गांधी, स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेसचे नेते के. कामराज, एआयएडीएमकेचे नेते एमजी रामचंद्रन आणि जे. जयललीता, गृहमंत्री अमित शहा, तामिळनाडूनचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांचे फोटो लावण्यात आले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीTamilnaduतामिळनाडूIndiaभारतTempleमंदिरPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना