धक्कादायक! तरुणाने दोन गर्लफ्रेंडच्या मदतीने तिसरीला संपवलं, विषारी इंजेक्शन टोचलं आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 18:53 IST2025-03-08T18:45:22+5:302025-03-08T18:53:27+5:30
Tamil Nadu Crime News: का तरुणाने त्याच्या दोन प्रेयसींच्या मदतीने तिसऱ्या प्रेयसीची हत्या केल्याचं उघड झालं आहे. आरोपी तरुण आणि त्याच्या दोन प्रेयसींनी या महिलेला आधी विषारी इंजेक्शन टोचलं. त्यानंतर तिने आत्महत्या केली असे भासवण्यासाठी तिचा मृतदेह दरीत फेकून दिला. मात्र अखेरीस या तिघांचंही बिंग फुटलं.

धक्कादायक! तरुणाने दोन गर्लफ्रेंडच्या मदतीने तिसरीला संपवलं, विषारी इंजेक्शन टोचलं आणि...
अनैतिक संबंध, प्रेमप्रकरण यामधून होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण मागच्या काही काळात मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. दरम्यान, तामिळनाडूमधील सेलम जिल्ह्यात अशाच प्रेमप्रकरणातून घडलेल्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने त्याच्या दोन प्रेयसींच्या मदतीने तिसऱ्या प्रेयसीची हत्या केल्याचं उघड झालं आहे. आरोपी तरुण आणि त्याच्या दोन प्रेयसींनी या महिलेला आधी विषारी इंजेक्शन टोचलं. त्यानंतर तिने आत्महत्या केली असे भासवण्यासाठी तिचा मृतदेह दरीत फेकून दिला. मात्र अखेरीस या तिघांचंही बिंग फुटलं.
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १ मार्च रोजी तामिळनाडू पोलिसांना दरीमध्ये एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला होता. सुरुवातीला या महिलेने आत्महत्या केली असावी, असं पोलिसांना वाटलं. अधिक तपास केल्यावर या महिलेचं नाव लोगानायागी असल्याचं समोर आलं. तसेच ती एका खाजगी कोचिंग सेंटरमध्ये काम करत होती, अशी माहिती समोर आली. दरम्यान, ही महिला १ मार्चपासून बेपत्ता असल्याचेही समोर आले.
त्यानंतर पोलिसांनी या महिलेचा फोन तपासला असता, तिने अब्दुल अबीज नावाच्या २२ वर्षीय तरुणाला शेवटचा फोन कॉल केल्याचे समोर आले. तसेच लोगानायागी आणि अब्दुल यांचे संबंध होते आणि ती अब्दुलला भेटण्यासाठी येरकॉड येथे गेल्याचीही माहिती तपासातून उघड झाली. पोलिसांनी तपासाची सूत्रे अब्दुल याच्यावर केंद्रित केल्यानंतर अब्दुल याने त्याच्या इतर दोन गर्लफ्रेंड थाविया सुल्ताना आणि मोनिषा यांच्यांसोबत मिळून लोगानायागी हिच्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती पोलिसाना मिळाली.
लोगानायागी हिने आपल्यासोबतचं नातं तोडावं, असं अब्दुलला वाटत होतं. मात्र ती यासाठी तयार नव्हती. उलट अब्दुलसाठी आपला धर्म बदलण्याची तयारीही तिने केली होती. त्यासाठी लोगानायागी हिने तिचं नाव बदलून अल्बिया असं स्वत:चं नामकरणही केलं होतं. मात्र अब्दुल याला तिच्यासोबत संबंध ठेवायचे नव्हते. उलत आयटी कर्मारी असलेली थाविया आणि नर्स असलेल्या मोनिशामध्ये त्याचं मन गुंतलं होतं. त्यामुळे लोगानायागी हिच्यापासून सुटका करून घेण्यासाठी अब्दुल याने तिच्या हत्येचा कट रचला. तसेच या कटामध्ये त्याने त्याच्या दोन गर्लफ्रेंड्सनाही सहभागी करून घेतले.
अब्दुल आणि त्याच्या दोन्ही प्रेयसींनी येरकॉड येथे लोगानायागी हिची भेट घेतली. त्यानंतर तिला पेन किलर असल्याचं सांगून एक विषारी इंजेक्शन दिलं. लोगानायागी बेशुद्ध झाल्यावर त्यांनी तिला दरीत फेकून दिले. आता पोलिसांनी तपासानंतर येरकॉड पोलिसांनी अब्दुल, थाविया आणि मोनिशा यांना अटक केली आहे.