अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 15:44 IST2026-04-03T15:43:38+5:302026-04-03T15:44:34+5:30

Tamil Nadu Assembly Election 2026: दक्षिणेतील प्रमुख राज्य असलेल्या तामिळनाडूमध्ये एनडीएच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असलेल्या भाजपाने पक्षातील तरुण नेते के. अन्नामलाई यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

Tamil Nadu Assembly Election 2026: K. Annamalai denied candidature, BJP's shocking decision in Tamil Nadu, what is the reason? | अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 

अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 

दक्षिणेतील प्रमुख राज्य असलेल्या तामिळनाडूमध्ये एनडीएच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असलेल्या भाजपाने आपल्या २७ उमेदवारांची यादी आज प्रसिद्ध केली आहे. भाजपानेतामिळनाडूमध्ये आपल्या उमेदवारांची निवड करताना पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना संधी दिली आहे. मात्र उमेदवारी देताना भाजपाने एक धक्कादायक निर्णय घेतला असून, पक्षातील तरुण नेते के. अन्नामलाई यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने एनडीएच्या माध्यमातून अण्णा द्रमुक या प्रमुख पक्षासह इतर छोट्या पक्षांसोबत आघाडी केली आहे. तसेच एकूण २३४ जागा असलेल्या विधानसभेच्या जागावाटपात भाजपाच्या वाट्याला २७ जागा आल्या आहेत. या २७ जागांवरील उमेदवारांची घोषणा भाजपाकडून आज करण्यात आली आहे. यात केंद्रीय मंत्र्यांपासून ते माजी राज्यपालांपर्यंत अनेक बड्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांचं नाव मात्र यात नाही आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपासून तामिळनाडूच्या राजकारणात भाजपाला महत्त्वाचं स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अन्नामलाई यांना निवडणुकीपासून दूर ठेवण्याच्या भाजपाच्या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. मात्र अन्नामलाई यांची भूमिका ही पक्षाच्या रणनीतीपासून ते निवडणुकीच्या प्रचारापर्यंत व्यापक राहणार आहे, असे सांगत भाजपाच्या नेत्यांनी या मुद्द्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र तामिळनाडूत भाजपाने एआयएडीएमकेसोबत केलेली आघाडी आणि अन्नामलाई यांचे एआयएडीएमकेशी असलेले कटू संबंध यामुळे अन्नामलाई यांना भाजपाने निवडणुकीच्या रिंगणापासून दूर ठेवले, असे बोलले जात आहे. दरम्यान, भाजपाने आज प्रसिद्ध केलेल्या उमेदवारी यादीमध्ये केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांच्यापासून ते माजी राज्यपाल सुंदरराजन यांच्यापर्यंत अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. त्यात एल. मुरुगन यांना पक्षाने अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या अविनासी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर तेलंगाणाच्या माजी राज्यपाल असलेल्या तिमिलासाई सुंदरराजन यांना मायलापूर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय कोईंबतूर (उत्तर) मतदारसंघातून व्ही. श्रीनिवासन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  

Web Title : अन्नामलाई को टिकट नहीं: तमिलनाडु में भाजपा का चौंकाने वाला फैसला, कारण अस्पष्ट

Web Summary : भाजपा ने तमिलनाडु उम्मीदवारों की घोषणा की, जिसमें प्रमुख नेता के. अन्नामलाई को आश्चर्यजनक रूप से बाहर रखा गया। भाजपा को मजबूत करने के उनके प्रयासों के बावजूद, उनके बहिष्कार से सवाल उठते हैं। एआईएडीएमके के साथ गठबंधन और संभावित तनावपूर्ण संबंध एक कारक हो सकते हैं। वरिष्ठ नेताओं को नामांकन मिला।

Web Title : Annamalai Denied Ticket: BJP's Shocking Tamil Nadu Decision, Reasons Unclear

Web Summary : BJP announced Tamil Nadu candidates, surprisingly excluding K. Annamalai, a prominent leader. Despite his efforts to strengthen BJP, his exclusion raises eyebrows. Alliances with AIADMK and potential strained relationships may be a factor. Senior leaders secured nominations.