शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा सांभाळ करणं ही प्रोफेशनली भिकारी असलेल्या पतीचीही जबाबदारी - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 16:10 IST

न्यायमूर्ती एचएस मदान यांच्या खंडपीठाने घटस्फोट प्रकरणात पतीची याचिका फेटाळताना वरील बाब नमूद केली आहे.

चंढीगड - पती-पत्नीचं नातं हे सात जन्मासाठी बांधलेलं असतं. सप्तपदी घेतल्यानंतर, लग्नगाठ बांधल्यानंतर सात जन्मासाठी हे जोडपं एकमेकांचे साथीदार बनून नव्या आयुष्याला सुरुवात करतात. भारतात कायद्यानुसार विवाह बंधनालाही मर्यादा आणि अधिकार दिले आहेत. त्यामुळे, कायदेशीर बाबींनीही हे जोडपं अडकलेलं असतं. कोर्टात अनेक खटले विवाह आणि घटस्फोटासंदर्भात असतात. त्यासंदर्भात निर्णय देताना न्यायालयाकडून अनेक बाबींच्या नोंदी केल्या जातात. नुकतेच हरयाणा हायकोर्टाने पती-पत्नीच्या नात्यातील जबाबदारीबद्दल महत्त्वाचं विधान केलंय. पत्नीची जबाबदारी ही पतीचीच असते. पती पत्नीची जबाबदारी घेतच असतो. मात्र, महिला वर्ग आता स्वतंत्रपणे व्यक्त होत आहे, नोकरी-उद्योग व्यवसयात उतरत आहे. स्वत: अर्थार्जन करत आहे. त्यामुळे, महिला किंवा पत्नी त्यांची जबाबदारी स्वत: उचलताना दिसून येतात. मात्र, कायद्यानुसार पत्नीची जबाबदारी ही पतीचीच आहे, असं मत न्यायालयाने नोंदवलं आहे. 

'पत्नीची देखभाल करणं हे पतीचं नैतिक आणि कायदेशीर कर्तव्य आहे. पती प्रोफेशनल भिकारी असला तरी स्वतःची देखभाल करु शकत नसलेल्या पत्नीला सांभाळण्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी त्याची आहे,' असे पंजाब आणि हरियाणा न्यायालयाने म्हटलं आहे.

न्यायमूर्ती एचएस मदान यांच्या खंडपीठाने घटस्फोट प्रकरणात पतीची याचिका फेटाळताना वरील बाब नमूद केली आहे. कनिष्ठ न्यायालयाने पत्नीला पोटगी देण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या या आदेशाविरोधात पतीने हायकोर्टात फेरविचार याचिका दाखल केली. घटस्फोट प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत पत्नीला मिळणारी मासिक पोटगी थांबवावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. मात्र, न्यायालयाने पतीचा फेरविचार याचिका फेटाळून लावली आहे. 

'प्रोफेशनल भिकारी असलेला पतीवर देखील स्वतःची देखभाल करु शकत नसलेल्या पत्नीला सांभाळण्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. पत्नीला उत्पन्नाचे कोणते साधन मिळाले आहे किंवा तिच्याकडे पुरेशी संपत्ती आहे, हे याचिकाकर्त्या पतीला सिद्ध करता आलं नाही.', असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. 

टॅग्स :marriageलग्नWomenमहिलाBeggarभिकारीHigh Courtउच्च न्यायालय