शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : भाजपाला साप आणि स्वतःला मुंगूस म्हणवणारे स्वामी प्रसाद मौर्य यांना पराभवाचा धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 18:13 IST

Swami Prasad Maurya : भाजपा सोडून समाजवादी पार्टीत दाखल झालेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊ लागले आहेत. आतापर्यंत 403 विधानसभा जागांच्या सुरूवातीच्याकलांमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजपा पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. अशा स्थितीत नुकतेच भाजपा सोडून समाजवादी पार्टीत दाखल झालेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीपूर्वी भाजपा सोडून समाजवादी पार्टीमध्ये दाखल झालेले स्वामी प्रसाद मौर्य निवडणुकीत फाजिलनगरमधून  पराभूत झाले आहेत. हा पराभव स्वामी प्रसाद मौर्य आणि समाजवादी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजपाचे सुरेंद्र कुशवाह यांनी या जागेवरून विजय मिळवला आहे. सुरेंद्र कुशवाह यांनी येथे 26 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. 

अशा परिस्थितीत ट्विट करून सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना  स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, "मी निवडणूक हरलो, हिम्मत नाही. संघर्षाची मोहीम सुरूच राहणार आहे." दरम्यान, स्वामी प्रसाद मौर्य यांच्या निवडणुकीपूर्वीच्या वक्तव्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. भाजपा सोडताच स्वामी प्रसाद मौर्य यांनी स्वत:चे मुंगूस असे वर्णन केले होते. नाग रुपी आरएसएस आणि साप रुपी भाजपाला स्वामी रुपी मुंगूस उत्तर प्रदेशातून संपवूनच श्वास घेईल, असे स्वामी प्रसाद मौर्य यांनी म्हटले होते. 

तब्बल 40 वर्षांची राजकीय कारकीर्द स्वामी प्रसाद मौर्य हे पाच टर्म आमदार असून त्यांची राजकीय कारकीर्द तब्बल 40 वर्षांची आहे. सन 2016 पर्यंत ते मायवतींसोबत बसपाचा चेहरा म्हणून होते. 2017 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा विधानसभेत निवडून गेले. स्वामी प्रसाद मौर्य हे उत्तर प्रदेशमधील मागास समाजाचा मोठा चेहरा समजले जातात. त्यामुळे त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. मात्र, स्वामी प्रसाद मौर्य यांनी 11 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री पदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर त्यांनी भाजपाला देखील रामराम ठोकला होता. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीUttar Pradeshउत्तर प्रदेश