स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 11:24 IST2025-09-28T11:23:10+5:302025-09-28T11:24:44+5:30
दिल्ली पोलिसांनी स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांना अटक केल्यानंतर त्यांची खरी ओळख उघड केली आहे. त्यांच्याकडून दोन बनावट व्हिजिटिंग कार्ड आणि ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
दिल्लीतील एका व्यवस्थापन संस्थेतील विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाप्रकरणी, दिल्ली पोलिसांनी आग्रामध्ये स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांना अटक केली. याबाबत आता आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरूने आपली ओळख लपवण्यासाठी आणि लोकांना दिशाभूल करण्यासाठी बनावट आंतरराष्ट्रीय ओळखपत्रे आणि व्हिजिटिंग कार्ड मिळवले होते. आग्रामध्ये अटक टाळण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुरूचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.
आता, पोलिसांनी स्वामी चैतन्यानंद यांच्याकडून दोन व्हिजिटिंग कार्ड जप्त केले आहेत, हे बनावट आहेत. पहिल्या कार्डमध्ये, त्याने स्वतःला संयुक्त राष्ट्रांमध्ये 'कायमस्वरूपी राजदूत' म्हणून वर्णन केले होते. हे कार्ड अतिशय व्यावसायिक पद्धतीने बनवले गेले होते, यामुळे कोणालाही फसवणे सोपे झाले.
दुसऱ्या कार्डमध्ये, स्वामी चैतन्यानंद यांनी स्वतःला ब्रिक्स देशांच्या संयुक्त आयोगाचे सदस्य आणि भारताचे 'विशेष दूत' असे वर्णन केले आहे. बाबांनी या कार्डचा वापर त्यांचा प्रभाव आणि पोहोच दाखवण्यासाठी केला. स्वामी चैतन्यानंद यांनी या कार्डांचा वापर सामान्य लोकांना आणि उच्चभ्रू व्यक्तींना धमकावण्यासाठी केला होता, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावशाली व्यक्ती म्हणून त्यांची प्रतिमा मांडली होती.
स्वामी चैतन्यानंद यांचे सहकारी पोलिसांच्या रडारवर
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या गुरूच्या कारवायांबाबत अनेक तक्रारी आधीच प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींमध्ये स्वामी चैतन्यानंद याने लोकांचा विश्वास आणि नफा मिळवण्यासाठी खोटे दावे केल्याचा आरोप आहे. सध्या, पोलिसांनी फसवणुकीत वापरलेले कागदपत्रे जप्त केली आहेत आणि प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.