लाल किल्ल्याच्या मागे संशयास्पद हालचाली; कारमध्ये सापडला पुलवामाचा तोतया NIA अधिकारी, चौकशी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:30 IST2026-02-19T15:59:08+5:302026-02-19T16:30:18+5:30

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ संशयित कार आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Suspicious J&K Vehicle Near Red Fort Fake NIA Officer Arrested with Counterfeit ID Joint Interrogation Underway | लाल किल्ल्याच्या मागे संशयास्पद हालचाली; कारमध्ये सापडला पुलवामाचा तोतया NIA अधिकारी, चौकशी सुरु

लाल किल्ल्याच्या मागे संशयास्पद हालचाली; कारमध्ये सापडला पुलवामाचा तोतया NIA अधिकारी, चौकशी सुरु

Red Fort Fake NIA Official: दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ पोलिसांनी एका संशयित कारचा पाठलाग करून एका बड्या ठगाला अटक केली आहे. हा आरोपी स्वतःला राष्ट्रीय तपास यंत्रणेचा अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करत होता. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी असलेल्या या आरोपीकडून बनावट ओळखपत्र आणि एक कार जप्त करण्यात आली आहे.

१८ फेब्रुवारी २०२६ रोजी कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक लाल किल्ला परिसरात गस्त घालत होते. यावेळी दिल्ली चलो पार्कजवळ काळ्या रंगाची ह्युंदाई सँट्रो कार संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी कारची झडती घेतली असता, त्यामध्ये दोन व्यक्ती बसल्या होत्या.

खोट्या NIA ऑफिसरचा पर्दाफाश

पोलिसांनी विचारपूस केली असता, कारमधील मुख्य व्यक्तीने आपली ओळख मुदस्सिर अशी सांगितली. त्याने पोलिसांवर दबाव आणण्यासाठी स्वतःला एनआयएचा अधिकारी असल्याचे सांगितले आणि एक ओळखपत्रही दाखवले. मात्र, ओळखपत्र बनावट पाहून पोलिसांना संशय आला. त्यानंतर त्याला आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला पोलीस ठाण्यात नेऊन कसून चौकशी करण्यात आली.

नोकरीच्या नावाखाली गरिबांची लूट

चौकशीदरम्यान मुदस्सिरने अनेक धक्कादायक खुलासे केले. मुदस्सिर काश्मीरमधील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील तरुणांना दिल्लीत सरकारी किंवा खाजगी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळायचा. त्याच्यासोबत असलेला मुलगा काश्मीरमधीलच असून, त्याला नोकरीचे आमिष दाखवून त्याने १२ फेब्रुवारीला काश्मीर सोडले आणि १३ फेब्रुवारीला ते दिल्लीत दाखल झाले. हे प्रकरण संवेदनशील असल्याने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलसह इंटेलिजन्स ब्युरो आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी आरोपीची संयुक्त चौकशी केली.

लाल किल्ल्याची सुरक्षा आणि संवेदनशीलता

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लाल किल्ल्यासमोर एका कारमध्ये स्फोट झाला होता, ज्यात अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला होता. या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्याजवळ जम्मू-काश्मीर नंबरची गाडी आणि बनावट अधिकारी आढळल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. मात्र, हा केवळ फसवणुकीचा प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.

दरम्यान, मुदस्सिर विरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने आतापर्यंत किती जणांना अशा प्रकारे लुटले आहे आणि या कटात त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.

Web Title : लाल किले के पास नकली एनआईए अधिकारी गिरफ्तार; पुलवामा कनेक्शन का शक

Web Summary : दिल्ली के लाल किले के पास एक व्यक्ति को एनआईए अधिकारी बताकर धोखाधड़ी करते हुए गिरफ्तार किया गया। पुलवामा, कश्मीर के इस व्यक्ति के पास से नकली आईडी और संदिग्ध कार बरामद हुई। वह नौकरी के नाम पर युवाओं को ठगता था। जांच जारी है।

Web Title : Fake NIA Officer Busted Near Red Fort; Pulwama Link Suspected

Web Summary : A man posing as an NIA officer was arrested near Delhi's Red Fort. The individual, from Pulwama, Kashmir, was found with fake ID and a suspicious car. He lured youth with job offers, extorting money. Investigation ongoing.