शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

EVM वर संशय, काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे घेतली धाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2018 7:38 PM

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मतदान आटोपून सर्वपक्षीय उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले आहे. मात्र 11 तारखेला होणाऱ्या मतमोजणीपूर्वीच इव्हीएममध्ये छेडछाड होऊन निकाल प्रभावित केले जातील, अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे.

ठळक मुद्दे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मतदान आटोपून सर्वपक्षीय उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले आहे 11 तारखेला होणाऱ्या मतमोजणीपूर्वीच इव्हीएममध्ये छेडछाड होऊन निकाल प्रभावित केले जातील, अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे.आज काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील निकाल बदलवण्यासाठी छडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला

नवी दिल्ली - मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मतदान आटोपून सर्वपक्षीय उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले आहे. मात्र 11 तारखेला होणाऱ्या मतमोजणीपूर्वीच इव्हीएममध्ये छेडछाड होऊन निकाल प्रभावित केले जातील, अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे आज काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील निकाल बदलवण्यासाठी छडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच इव्हीएमच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी आणि मनीष तिवारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली. तसेच दोन वेगवेगळी पत्रके निवडणूक आयोगाला सोपवली. तसेच या राज्यांमधील निवडणूक निकाल आणि मतमोजणी प्रभावित करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली. तसेच मध्य प्रदेशमधील निवडणुकीचे निकाल बदलवण्यासाठी इव्हीएममध्ये छेडछाड करण्याचे मोठे छडयंत्र रचण्यात येत असल्याचाही आरोप काँग्रेसने केला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तर कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी इव्हीएममध्ये होऊ शकणाऱ्या छेडछाडीच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.  

टॅग्स :ElectionनिवडणूकMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Chhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018congressकाँग्रेस