शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

NDTVवरील बंदीला केंद्राची स्थगिती

By admin | Updated: November 7, 2016 20:11 IST

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीवर घातलेल्या एक दिवसाच्या बंदीला अखेर स्थगिती दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 7 - केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीवर घातलेल्या एक दिवसाच्या बंदीला अखेर तात्पुरती स्थगिती दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री वेंकय्या नायडू यांनी ही घोषणा केली आहे. एनडीटीव्हीनं आजच या बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली होती. त्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं उद्या सुनावणीही ठेवली होती. मात्र अचानक माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ही बंदी उठवल्यानं केंद्र सरकार बॅकफूटवर गेलं आहे. गेल्याच आठवड्यात पठाणकोट दहशतवादी हल्ल्याची संवेदनशील माहिती प्रसारित केल्याचा ठपका ठेवत केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एका समितीने 9 नोव्हेंबर रोजी एनडीटीव्हीचे प्रसारण एका दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या माहितीचा उपयोग दहशतवाद्यांचे हँडलर्स करू शकले असते, असंही त्यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं म्हटलं होतं. (बंदीविरोधात एनडीटीव्ही सर्वोच्च न्यायालयात)('एनडीटीव्ही'नंतर आता 'या' दोन चॅनलवर बंदी)दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एनडीटीव्हीला जानेवारी महिन्यातच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. एनडीटीव्हीवरील एका दिवसाच्या बंदीचा सर्वत्र निषेध होत असतानाच हा प्रकार म्हणजे माध्यम स्वातंत्र्यावर आघात आहे, अशी टीका सर्वस्तरांतून होत होती. या सर्व पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या बंदीला स्थगिती दिल्याची आता चर्चा आहे.