काँग्रेस तोंडावर आपटला; सुषमा स्वराजांनी त्यांचा 'तो' पोल रिट्विट केला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 13:48 IST2018-03-27T13:44:53+5:302018-03-27T13:48:24+5:30

साहजिकच भाजपाला लक्ष्य करण्याची काँग्रेसची खेळी त्यांच्यावरच उलटली.

Sushma Swaraj retweeted a Congress poll about her failure | काँग्रेस तोंडावर आपटला; सुषमा स्वराजांनी त्यांचा 'तो' पोल रिट्विट केला!

काँग्रेस तोंडावर आपटला; सुषमा स्वराजांनी त्यांचा 'तो' पोल रिट्विट केला!

नवी दिल्ली: आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे दात घशात  कसे घालायचे, याचा वस्तुपाठ नुकताच केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी घालून दिला. काँग्रेस पक्षाकडून सोमवारी ट्विटरवर एक पोल घेण्यात आला होता. यामध्ये त्यांनी इराकमधील 39 भारतीयांच्या मृत्यू हे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे अपयश आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर हो किंवा नाही, असे दोन पर्याय देण्यात आले होते. साधारण 34 हजार लोकांनी यावर कौल दिला होता. यापैकी 76 टक्के लोकांनी यासाठी सुषमा स्वराज जबाबदार नसल्याचे सांगत 'नाही' या पर्यायावर क्लिक केले होते. तर 24 टक्के लोकांनी 'होय' या पर्यायावर क्लिक केले. साहजिकच भाजपाला लक्ष्य करण्याची काँग्रेसची खेळी त्यांच्यावरच उलटली. 

मात्र, त्यानंतर सुषमा स्वराज यांनी केलेल्या एका स्मार्ट खेळीने काँग्रेस आणखीनच तोंडघशी पडला. त्यांनी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करण्यात आलेला हा पोल रिट्विट केला. स्वराज यांच्या ट्विटर प्रोफाइलवर हा पोल पाहून अनेकांनी कमेन्टमध्ये आश्चर्य व्यक्त केले. तर अनेकांनी स्वराज यांनी ही संधी अचूक साधल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.







 

Web Title: Sushma Swaraj retweeted a Congress poll about her failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.