शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सुषमा स्वराज यांनी मला ट्वीटरवर ब्लॉक केलं; प्रतापसिंह बाजवा यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 14:22 IST

राज्यसभेतील कॉंग्रेसचे खासदार असणाऱ्या प्रतापसिंह बाजवा यांना आपल्याला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ब्लॉक केल्याचे लक्षात आले.

ठळक मुद्दे बेपत्ता झालेल्या भारतीयांबाबत सुषमा स्वराज यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात संसदेची दिशाभूल केली असा आरोप बाजवा यांनी केला आहे.इराकमधील मोसूलजवळ 39 भारतीय बेपत्ता झाले असून त्यात पंजाबमधील अमृतसर, गुरुदासपूर, होशियारपूर, कपूरथळा, जालंधर शहरांमधील लोकांचा समावेश आहे.

नवी दिल्ली- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्याला ट्वीटरवर ब्लॉक केल्याचा आरोप राज्यसभेतील कॉंग्रेसचे खासदार यांनी केला आहे. इराकमध्ये बेपत्ता झालेल्या 39 भारतीयांबद्दल प्रश्न विचारल्याबद्दल सुषमा स्वराज यांनी मला ब्लॉक केले असे बाजवा म्हणाले आहेत.

"अशाप्रकारे तुम्ही परराष्ट्र मंत्रालय चालवणार आहात का ? संसद सदस्याने 39 बेपत्ता भारतीयांबद्दल विचारलेल्या प्रश्नांबाबत तुम्ही अशा प्रकारे व्यक्त झालात तर परराष्ट्र मंत्रालय कार्यालयाचा सन्मान राहिल का ?" अशा शब्दांमध्ये संताप व्यक्त करत बाजवा यांनी बुधवारी परराष्ट्रमंत्री  सुषमा स्वराज यांना विचारलेल्या प्रश्नाच्या ट्वीटचे स्क्रीन शॉटसही दिले आहेत. "पंजाब आणि देशाच्या इतर भागातील लोक परदेशात विविध समस्यांना तोंड देत आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संबंधित देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी या विषयावर चर्चा करावी असे मी खासदार या नात्याने ट्वीट केले होते मात्र जर त्या खासदारालाच ब्लॉक करत असतील तर मग बाकीच्यांचे काय होईल ?" असा प्रश्न बाजवा यांनी विचारला आहे.गुरुदासपूरचे माजी खासदार आणि कॉंग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या बाजवा यांना आपल्याला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ब्लॉक केल्याचे लक्षात आले. पाकिस्तानातील खैबर-पख्तुनवा प्रांतात शिख समुदायातील लोकांना जबरदस्तीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले जात असल्याबद्दल ट्वीट करुन बाजवा यांनी सुषमा स्वराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यामध्ये टॅग केले. बेपत्ता झालेल्या भारतीयांबाबत सुषमा स्वराज यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात संसदेची दिशाभूल केली असा आरोप बाजवा यांनी केला आहे. इराकमधील मोसूलजवळ 39 भारतीय बेपत्ता झाले असून त्यात पंजाबमधील अमृतसर, गुरुदासपूर, होशियारपूर, कपूरथळा, जालंधर शहरांमधील लोकांचा समावेश आहे.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजIndiaभारतParliamentसंसदcongressकाँग्रेस