शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

सुषमा स्वराजांनी पुन्हा करुन दाखवलं, उपचारासाठी पाकिस्तानच्या दोन नागरिकांना दिला मेडिकल व्हिसा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2017 11:49 AM

ट्विटरच्या माध्यमातून नेहमी सक्रीय असणा-या केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पुन्हा एकदा आपल्यातील कटू संबंधांना आड येऊन न देता पाकिस्तानी नागरिकांना मदत केली आहे

ठळक मुद्देलाहोरमधील उजैर हुमायून यांनी आपल्या तीन वर्षीय मुलीच्या उपचारासाठी मेडिकल व्हिसा देण्याची विनंती केली होतीनूरमा हबिब यांनी 6 ऑक्टोबर रोजी ट्विट करत सुषमा स्वराज यांच्याकडे वडिलांच्या यकृत प्रत्यारोपणासाठी मेडिकल व्हिसा देण्याची विनंती केली होतीसुषमा स्वराज यांनी दोन्ही पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा दिला आहे

नवी दिल्ली - ट्विटरच्या माध्यमातून नेहमी सक्रीय असणा-या केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पुन्हा एकदा आपल्यातील कटू संबंधांना आड येऊन न देता पाकिस्तानी नागरिकांना मदत केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अद्यापही ताणलेले असून संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भाषण करताना सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावत जागा दाखवून दिली होती. मात्र याचा परिणाम सुषमा स्वराज यांनी नागरिकांवर तसंच आपल्या कामावर होऊ दिलेला नाही. मेडिकल व्हिसासाठी विनंती करण-या दोन पाकिस्तानी नागरिकांना सुषमा स्वराज यांनी काही तासात उत्तर देत व्हिसा देण्याचं आश्वासन दिलं.     

लाहोरमधील उजैर हुमायून यांनी आपल्या तीन वर्षीय मुलीच्या उपचारासाठी मेडिकल व्हिसा देण्याची विनंती केली होती. त्यांच्या मुलीला ह्रदयाचा आजार असून त्यासाठी त्यांना भारतात येऊन उपचार करायचे होते. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी सुषमा स्वराज यांच्याकडे व्हिसासाठी विनंती केली होती. 'माझ्या तीन वर्षाच्या मुलीची हार्ट सर्जरी करणं गरजेचं आहे. कृपया आम्हाला व्हिसा द्यावा. आम्ही तुमचे आभारी राहू', असं ट्विट त्यांनी केलं होतं.

 

सुषमा स्वराज यांनी तात्काळ ट्विटला उत्तर देत व्हिसा देण्याचं आश्वासन दिलं. 'तुमच्या तीन वर्षाच्या मुलीवर भारतात उपचार करण्यासाठी आम्ही व्हिसा देत आहेत. लवकरात लवकर तिची तब्बेत सुधारावी यासाठी आम्हीदेखील प्रार्थना करतो', असं ट्विट सुषमा स्वराज यांनी केलं. 

यानंतर काही मिनिटातच सुषमा स्वराज यांनी दुस-या एका पाकिस्तानी नागरिकाला उत्तर देत मेडिकल व्हिसा देत असल्याचं सांगितलं. यकृत प्रत्यारोपणाकरिता पाकिस्तानी नागरिकाला व्हिसा हवा होता. नूरमा हबिब यांनी 6 ऑक्टोबर रोजी ट्विट करत सुषमा स्वराज यांच्याकडे वडिलांच्या यकृत प्रत्यारोपणासाठी मेडिकल व्हिसा देण्याची विनंती केली होती. त्यांच्या ट्विटलाही सुषमा स्वराज यांनी उत्तर देत तुम्हाला व्हिसा देत असल्याचं सांगितलं. 

सुषमा स्वराज यांनी सीमारेषेपलीकडील नागरिकांना मदत करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अनेकदा सुषमा स्वराज यांनी वैद्यकीय उपचारासाठी पाकिस्तानी नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनी सुषमा स्वराज यांनी कॅन्सरशी झुंज देणा-या पाकिस्तानी महिलेला व्हिसा दिला होता. सोशल मीडियाचा पुरेपूर आणि व्यवस्थित वापर सुषमा स्वराज करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानला सुनावतानाही त्या मागे पुढे पाहत नाहीत. पाकिस्तानी नागरिकांनी मेडिकल व्हिसासाठी पत्र न देणा-या सरताज अझिझ यांना सुषमा स्वराज यांनी चांगलंच सुनावलं होतं. 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजPakistanपाकिस्तान