शहरं
Join us  
Trending Stories
1
सुभेंदु अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजन दावा
2
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
3
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
4
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
5
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
6
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
7
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
8
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
9
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
10
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
11
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
12
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
13
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
14
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
15
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
16
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
17
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
18
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
19
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
20
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
Daily Top 2Weekly Top 5

"सुशील कुमार शिंदे, मीरा कुमार आणि आता..’’, चिराग पासवान यांनी राहुल गांधी आणि ‘इंडिया’ला खिंडीत गाठलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 18:40 IST

Lok Sabha Speaker Election 2024: लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी देताना इंडिया आघाडीने दलित कार्ड खेळलं आहे. मात्र त्यावरून केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला टोला लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे नेते हे कमालीचे उत्साहित आहेत. तसेच या उत्साहाचा प्रत्यय सोमवारपासून सुरू झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनावरही दिसून येत आहे. विरोधी पक्षांचं ऐक्य दाखवण्यासाठी काँग्रेस आणि इंडिया आघाडीनेलोकसभा अध्यक्षांच्या निवडीवरून ताठर भूमिका घेत सत्ताधारी एनडीएच्या उमेदवाराविरोधात आपला उमेदवार दिला आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी देताना इंडिया आघाडीने दलित कार्ड खेळलं आहे. मात्र त्यावरून केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला टोला लगावला आहे. जेव्हा जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा काँग्रेसकडून दलितांचं नाव पुढे केलं जातं, असा आरोप चिराग पासवान यांनी सुशील कुमार शिंदे आणि मीरा कुमार यांचा उल्लेख करत केला आहे.

सोशल मीडिया साईट एक्सवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्येच चिराग पासवान म्हणाले की, जेव्हा काँग्रेस्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांना त्यांचा पराभव निश्चित असल्याचं दिसतं तेव्हा ते दलित कार्ड खेळतात. २००२ मध्ये जेव्हा त्यांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पराभव दिसू लागला तेव्हा त्यांनी सुशील कुमार शिंदे यांना उमेदवारी दिली.  तर २०१७ मध्ये जेव्हा राष्ट्रपती निवडणुकीत पराभव निश्चित दिसू लागला तेव्हा त्यांनी मीरा कुमार यांना उमेदवार बनवले. आताही त्यांच्याकडे लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी स्पष्टपणे संख्याबळ दिसत नसतानाही त्यांनी दलित नेते के सुरेश यांचं नाव समोर आणलं आहे. विरोधी पक्षांसाठी दलित केवळ प्रतिकात्मक उमेदवार आहेत का? असा सवाल चिराग पासवान यांनी विचारला आहे.

लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार देण्याचं निश्चित करण्यात आल्यानंतर काँग्रेसने आठ वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या के. सुरेश यांचं नाव पुढे केलं. दरम्यान, काँग्रेसच्या या निर्णयावर संधीसाधू राजकारण असल्याची टीका केली आहे. तर सत्ताधाऱ्यांनी लोकसभेचं उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना दिलं तर आम्ही अध्यक्षपदासाठी भरलेला अर्ज मागे घेऊ, असे संकेत काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी दिले आहेत.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीchirag paswanचिराग पासवानSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे