शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sushant Singh Rajput Suicide: "सुशांत आत्महत्या करू शकत नाही, त्याची हत्या करण्यात आली आहे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 09:36 IST

Sushant Singh Rajput Suicide: सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणारा सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. कूपर रुग्णालयात सुशांतच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं. यामधून त्यानं आत्महत्याच केल्याचं समोर आलं आहे. सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्याबद्दलची काही कागदपत्रदेखील त्याच्या घरात पोलिसांनी सापडली. त्यामुळे नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचललं असावं, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याच दरम्यान एका माजी खासदाराने धक्कादायक विधान केलं आहे. सुशांतची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं आहे. 

जन अधिकार पक्षाचे नेते आणि बिहारमधील माजी खासदार पप्पू यादव यांनी सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात एक धक्कादायक दावा केला आहे. 'सुशांत सिंह राजपूत हा कधीही आत्महत्या करू शकत नाही. त्याची हत्या करण्यात आली आहे' असं पप्पू यादव यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी या घटनेची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे. सुशांतच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे. 

'बिहारचा गौरव असलेला सुशांत सिंह राजपूत आत्महत्या करू शकत नाही. त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हायला हवी. पाटणातील त्याच्या घरी जाऊन सुशांतच्या वडिलांची भेट घेतली. त्यांची मागणी आहे की, याची सीबीआय चौकशी व्हायला हवी. घटनेच्या दोन तास आधी सुशांतसोबत त्यांचं बोलणं झालं होतं. आत्महत्या करण्यासारखं कोणतंही कारण नव्हतं. कुटुंबीयांना भेटून भावना विवश झालो आहे' असं ट्विट पप्पू यादव यांनी केलं आहे.

सुशांतने रविवारी सकाळी त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या घरातून पोलिसांनी कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. मध्यरात्री त्याने एका अभिनेत्याला शेवटचा फोन केला होता. मात्र त्या अभिनेत्याने फोन उचलला नाही. त्यामुळे दोघांचं बोलणं होऊ शकलं नाही. सुशांतला गेल्या 6 महिन्यांपासून नैराश्याने ग्रासल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

रविवारी सकाळी दहाच्या सुमारास सुशांतनं ज्युस मागवला. त्यानंतर तो त्याच्या खोलीत गेला. सुशांत बराच वेळ बाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या मित्रांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा लॉक होता. अखेर घरातील नोकरांनी चावी तयार करणाऱ्याला बोलावलं. त्यानंतर दार उघडण्यात आलं. त्यावेळी सुशांतचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर नोकरांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. सुशांतच्या वांद्रे येथील घरात चार जण राहतात. त्यामध्ये दोन आचारी, एक नोकर आणि एका आर्ट डिझायनराचा समावेश आहे. हा आर्ट डिझायनर सुशांतचा मित्र आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : दिलासादायक! घरच्या घरीही करता येणार कोरोनावर मात; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला

CoronaVirus News : अरे व्वा! तब्बल 18 दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या बाळाने जिंकली कोरोनाची लढाई

पाकिस्तानातील गाढवांची संख्या वाढली; 'या' देशासाठी फायदेशीर ठरली

CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय! 'ही' दोन लक्षणं असल्यास वेळीच व्हा सावध; नाहीतर...

माणुसकीला काळीमा! फोटोसाठी छाव्याचे केले असे हाल; अवस्था पाहून डोळ्यात येईल पाणी

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याBiharबिहारPoliceपोलिसDeathमृत्यू