शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

"आम्ही ऑपरेशन करतो, तेव्हा...", सर्जिकल स्ट्राइकवर उपस्थित झालेल्या प्रश्नावर लष्करातील अधिकारी स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 12:45 AM

Surgical Strike: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी नुकताच सर्जिकल स्ट्राइकवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला होता. केंद्र सरकार सर्जिकल स्ट्राइक आणि अनेक लोकांना मारल्याचे बोलते, मत्र याचा कसलाही पुरावा नाही, असे त्यांनी म्हटले होते.

"कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन करताना लष्करातील जवान कधीही कसलाही पुरावा मागे ठेवण्यासंदर्भात विचार करत नाहीत," असे लष्कराच्या पूर्व कमांडचे जीओसी-इन-सी लेफ्टनंट जनरल आरपी कालिता यांनी म्हटले आहे. ते 2016 मध्ये पाकिस्तानात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या (Surgical Strike) पुराव्यांसंदर्भात विरोधी पक्षांतील काही नेत्यांच्या मागणीच्या प्रश्नाला शुक्रवारी उत्तर देताना बोलत होते. 

कोलकात्यात प्रेस क्लबमध्ये ‘प्रेस से मिलिए’ या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, हा एक राजकीय प्रश्न आहे. त्यामुळे मी यावर भाष्य करणार नाही. मला वाटते, की देश भारतीय सशस्त्र दलावर विश्वास ठेवतो. यावेळी, ऑपरेशन दरम्यान लष्कर काही पुरावे ठेवते का? असा प्रश्न केला असता त्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. ते म्हणाले, जेव्हा आम्ही एखादे ऑपरेशन करतो, तो त्या ऑपरेशनचे कसलेही पुरावे आम्ही मागगे ठेवत नाही.

काँग्रेस नेत्याने मागीतले होते सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी नुकताच सर्जिकल स्ट्राइकवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला होता. केंद्र सरकार सर्जिकल स्ट्राइक आणि अनेक लोकांना मारल्याचे बोलते, मत्र याचा कसलाही पुरावा नाही, असे त्यांनी म्हटले होते. ते खोटे बोलून सरकार चालवत आहे. मात्र, त्यांच्या या वक्तव्यापासून काँग्रेसने स्वतःला वेगळे ठेवले होते. यावेळी देश हितासाठी पक्ष सर्व प्रकारच्या लष्करी कारवाईचे समर्थन करतो, असे काँग्रेसने म्हटले होते.

एवढेच नाही, तर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य हास्यास्पद असल्याचेही म्हटले होते. तसेच, लष्कर आपले काम अत्यंत चांगल्या प्रकारे करत आहे. त्यांना कसल्याही प्रकारचे पुरावे देण्याची आवश्यकता नाही, असेही राहुल यांनी म्हटले होते. 

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिक