सूरत अग्नितांडव: दोघांवर अटकेची कारवाई, मृतांचा आकडा 20वर पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 10:30 AM2019-05-25T10:30:06+5:302019-05-25T10:31:17+5:30

Surat Fire: या दुर्घटनेप्रकरणी प्रशासनाने सुरतमधील अशा कोचिंग क्लासेसवर बंदी घातली आहे.

surat fire killed many childrens illegal floor coaching class municipal corporation gujarat | सूरत अग्नितांडव: दोघांवर अटकेची कारवाई, मृतांचा आकडा 20वर पोहोचला

सूरत अग्नितांडव: दोघांवर अटकेची कारवाई, मृतांचा आकडा 20वर पोहोचला

Next

सूरत : सुरतमधील सरथाणा परिसरात असलेल्या तक्षशीला इमारतीला आग लागल्यामुळे काल सायंकाळी 20 विद्यार्थांच्या मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याचा तपास सूरत क्राइम ब्रांचकडे सोपविला आहे. 

काल शुक्रवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास तक्षशीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही भीषण आग लागली होती. या इमारतीत चौथ्या मजल्यावर एक कोचिंग क्लास घेण्यात येत होता. याच कोचिंग क्लासमध्ये ही आग लागली होती. आग लागल्यानंतर क्लासमध्ये एकच गोंधळ उडाला आणि बाहेर निघायला कुठलाही मार्ग नसल्याने जीव वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी चक्क चौथ्या मजल्यावरुन खाली उड्या मारल्या. यात 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. 


या दुर्घटनेप्रकरणी प्रशासनाने सुरतमधील अशा कोचिंग क्लासेसवर बंदी घातली आहे. अग्नीशमन विभागाने एनओसी दिल्यानंतरच कोचिंग क्लासेसवरील बंदी हटविण्यात येणार आहे. तर इमारत आग प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कोचिंग क्लासेसच्या दोन संचालकांना अटक केली आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास सूरत क्राइम ब्रांचकडे सोपविला आहे. 


दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी स्थानिक प्रशासनाला तातडीने आगीची चौकशी करण्याचे आणि या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही  आगीच्या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून स्थानिक प्रशासनाला मदत करण्याचे आदेश दिले आहेत. 



 

Web Title: surat fire killed many childrens illegal floor coaching class municipal corporation gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.