शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

“आम्ही दिलेल्या निर्णयांना तुमच्या लेखी अजिबात किंमत नाहीये का”; SC चा मोदी सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 18:06 IST

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चांगलेच फटकारले असून, तुम्ही आमच्या संयमाची परीक्षा पाहात आहात, असे म्हटले आहे.

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रातील मोदी सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्या. चंद्रचूड आणि न्या. नागेश्वर राव यांच्या खंडपीठासमोर एका प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानेकेंद्र सरकारला चांगलेच फटकारले असून, तुम्ही आमच्या संयमाची परीक्षा पाहात आहात. आम्ही दिलेल्या निर्णयांना तुमच्या लेखी अजिबात किंमत नाहीये का, अशी विचारणा केली आहे. (supreme court slams centre modi govt over tribunal vacancy)

ममता दीदींविरोधात निवडणूक लढवण्यासाठी BJP कडून ‘ही’ ६ नावे चर्चेत; काँग्रेसमध्ये दोन गट

न्यायालयांप्रमाणेच देशभरात विविध प्रकारच्या व्यावसायिक, पर्यावरण विषयक अशा वादांवर तोडगा काढण्यासाठी लवादांची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही काळापासून या लवादांमध्ये कर्मचारी वर्ग आणि अधिकारी वर्गाच्याही अनेक जागा रिकाम्या आहेत. वारंवार सांगून देखील त्या जागा सरकारकडून भरल्या जात नसल्यामुळे अखेर न्यायालयाने केंद्र सरकारला परखड शब्दांमध्ये सुनावले आहे.

“काँग्रेससह सप-बसपला मतदान करणे म्हणजे पाप, त्यांना मंदिरा जायलाही भीती वाटते”: भाजप

न्यायालयाच्या निकालांचा आजिबात आदर ठेवला जात नाही

देशभरातल्या विविध लवादांमधील नियुक्त्या रखडल्याच्या मुद्द्यावर तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. या न्यायालयाच्या निकालांचा आजिबात आदर ठेवला जात नाही. तुम्ही आमच्या संयमाची परीक्षा पाहात आहात. देशभरातील लवादांमध्ये तुम्ही किती लोकाची नेमणूक केली? तुम्ही म्हणताय, काही लोकांची नेमणूक झाली आहे. पण कुठे आहे ती नेमणूक?, असा प्रश्न सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार आत्तापर्यंत संबंधित लवादांवर नियुक्त्या का करण्यात आलेल्या नाहीत? अशा प्रकारे नियुक्त्या न करून तुम्ही या लवादांचे खच्चीकरण करत आहात. यापैकी अनेक लवाद हे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

“...तोपर्यंत कोरोनाची तिसरी लाटही ओसरेल, पण…” सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला सुनावले

फक्त तीनच पर्याय शिल्लक राहिलेत

आता आमच्याकडे फक्त तीन पर्याय शिल्लक आहेत. एक तर आम्ही यासंदर्भातील सरकारच्या कायद्यावरच स्थगिती आणावी. दुसरा, आम्ही सर्व लवाद बंद करून टाकावेत आणि उच्च न्यायालयाला सर्व अधिकार द्यावेत. किंवा तिसरा आम्ही स्वत:च या लवादांवर नियुक्त्या कराव्यात. ट्रिब्युनल कायदा हा सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवलेल्या तरतुदींचेच दुसरे रूप आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

नोकरीची सुवर्ण संधी! आधार कार्ड बनवणाऱ्या UIDAI मध्ये विविध पदांसाठी भरती; पाहा, डिटेल्स

दरम्यान, यासंदर्भात निर्णय घेऊन नियुक्त्या करण्यासाठी सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दोन आठवड्यांचा अवधी मागितला होता. मात्र, न्यायालयाने सरकारला पुढील सोमवारपर्यंतचा वेळ दिला आहे. तोपर्यंत या नियुक्त्या व्हायला हव्यात. आम्हाला यासंदर्भात कोणताही वाद घालायचा नाही किंवा तशी आमची इच्छाही नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी