UIDAI Recruitment 2021: नोकरीची सुवर्ण संधी! आधार कार्ड बनवणाऱ्या UIDAI मध्ये विविध पदांसाठी भरती; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 04:49 PM2021-09-06T16:49:49+5:302021-09-06T16:56:38+5:30

UIDAI Recruitment 2021: आधार कार्ड बनवणाऱ्या UIDAI मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

आताच्या घडीला आधार कार्ड हे अत्यावश्यक ओळखपत्र झाले आहे. बँकिंगपासून ते मोबाइलचे सीमकार्ड खरेदी करण्यापर्यंत अनेक कामांमध्ये आधार कार्ड ओळखपत्र म्हणून उपयोगी पडते.

कोरोना संकटाच्या काळात लाखो नोकऱ्या गेल्या. बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता हळूहळू अनेकविध गोष्टी पूर्वपदावर येत असून, नोकरीच्या उत्तमोत्तम संधी प्राप्त होत आहेत.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी असून, आधार कार्ड बनवणाऱ्या UIDAI मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, UIDAI ने खासगी सचिव आणि इतर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे. या भरती प्रक्रियेद्वारे १५ पदे भरली जातील. खाली नमूद केलेल्या पदांची भरती विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नियुक्तीसाठी योग्य आणि पात्र अधिकाऱ्यांमधून प्रतिनियुक्ती (परराष्ट्र सेवा tesm) आधारावर केली जाईल.

पात्रता, निवड प्रक्रियेसह संपूर्ण तपशील खाली दिले आहेत. अधिसूचनेनुसार, यूआयडीएआय चंदीगड, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, लखनऊ आणि रांची येथील प्रादेशिक कार्यालयांमध्ये पदांसाठी उमेदवारांची भरती करेल.

उमेदवारांनी भरलेले अर्ज प्रत्येक स्थानावर अधिकृत सूचना अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावे. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार UIDAI ची अधिकृत साइट तपासू शकतात. वेगवेगळ्या पदांसाठी पात्रता वेगळी आहे.

उमेदवारांना पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी या पदासाठी अर्ज करण्याची पात्रता काय आहे हे जाणून घेण्यासाठी https://uidai.gov.in/about-uidai/work-with-uidai/current-vacancies.html तपासावे.

या भरती प्रक्रियेद्वारे, खाजगी सचिवाची ७ पदे, उपसंचालकांची ३ पदे, सेक्शन ऑफिसरची ३ पदे आणि सहाय्यक लेखा अधिकारी यांची २ पदे भरली जाणार आहेत.

यूआयडीएआयने म्हटले आहे की इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज निर्धारित प्रोफार्मामध्ये भरून ते त्यांच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या एडीजी (एचआर) कडे पाठवू शकतात. तसेच, उमेदवार UIDAI च्या अधिकृत वेबसाइट http://www.uidai.gov.in ला भेट देऊ शकतात अर्ज आणि कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती मिळवू शकतात.

दरम्यान, जर तुम्हाला आधार कार्डाशी निगडीत तब्बल ३५ कामे अॅपद्वारे करून शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये mAadhaar App डाऊनलोड करावे लागेल. यामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबातील पाच सदस्यांचे आधार कार्ड ठेवू शकता. तसेच ते मॅनेज करणेही याद्वारे शक्य आहे.

जर तुमच्याकडे mAadhaar App चे जुने व्हर्जन असेल तर तुम्हाला ते अनइन्स्टॉल करून नवे अॅप डाऊनलोड करावे लागेल. UIDAI ने या अॅपचे नवे व्हर्जन सादर केले आहे. याद्वारे आता ग्राहकांना अनेक सुविधा देण्यात येत आहेत.