शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

निवडणुकीपूर्वी अजित पवारांना 'सुप्रीम' दिलासा; घड्याळ चिन्हाबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 13:51 IST

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीतही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवू शकणार आहेत.

NCP Ajit Pawar ( Marathi News ) : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या पक्षाचे घड्याळ हे चिन्ह गोठवण्याची मागणी कोर्टाने अमान्य केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीतही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवू शकणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हा मूळ पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटाला दिल्यानंतर शरद पवारांच्या पक्षाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. याप्रकरणाचा अंतिम निकाल अद्याप येणं बाकी आहे. मात्र या निकालापूर्वी आता होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाचं घड्याळ चिन्ह गोठवण्यात यावं, अशी मागणी शरद पवारांच्या पक्षाने केली होती. आज याबाबतचं प्रकरण सुनावणीसाठी न आल्याने शरद पवारांच्या पक्षाच्या वकिलांनी हे प्रकरण कोर्टासमोर मेन्शन केलं. मात्र यावेळी कोर्टाने घड्याळ चिन्ह गोठवण्यास नकार दिला आहे. अजित पवारांकडून एबी फॉर्म वाटण्यास सुरुवात 

सोमवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे  उमेदवार यादी जाहीर न करताच संबंधित उमेदवारांना हे एबी फॉर्म दिले जात आहेत. अजित पवार गटातील मंत्री आणि काही आमदारांना सोमवारी अजित पवार यांच्या देवगिरी या बंगल्यावर बोलवण्यात आले. तिथे स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते जवळपास १७ उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. यात प्रामुख्याने पक्षाचे मंत्री आणि विद्यमान आमदारांचा समावेश आहे. उरलेल्या उमेदवारांना मंगळवारी एबी फॉर्म दिले जाणार असून पक्षाची अधिकृत उमेदवार यादी बुधवारी जाहीर केली जाणार असल्याचे अजित पवार गटातील सूत्रांनी सांगितले. महायुतीमध्ये अजित पवार गटाला ५५ ते ६० जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार पक्षाने तयारी सुरू केली आहे.

एबी फॉर्म मिळालेले उमेदवार आणि मतदारसंघ

अजित पवार -बारामती, छगन भुजबळ -येवला, दिलीप वळसे पाटील - आंबेगाव, हसन मुश्रीफ - कागल, धनंजय मुंडे - परळी, नरहरी झिरवाळ - दिंडोरी, अनिल पाटील -अमळनेर, धर्मरावबाबा आत्राम -अहेरी, अदिती तटकरे - श्रीवर्धन, संजय बनसोडे -उदगीर, दत्तात्रय भरणे - इंदापूर, माणिकराव कोकाटे - सिन्नर, हिरामण खोसकर -इगतपुरी, दिलीप बनकर - निफाड, सरोज अहिरे - देवळाली, अण्णा बनसोडे -पिंपरी तसेच माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत गावित नवापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाकडून आपल्याला एबी फॉर्म मिळाल्याचे गावित यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारSupreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग