शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

CAA : 'जामिया' हिंसाचार प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; हायकोर्टात जाण्याचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 16:34 IST

Jamia Protest : या प्रकरणात समिती बनवू शकत नाही जी संपूर्ण देशातील प्रकरणाकडे लक्ष देईल.

नवी दिल्ली - सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशभरात हिंसक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राजधानी दिल्लीतील जामिया विद्यापीठात घडलेल्या हिंसाचाराबाबत सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिले आहेत. विविध ठिकाणी संबंधित घटना घडल्या असून त्याची सुनावणी सुप्रीम कोर्टात शक्य नाही असं सांगत जामिया हिंसाचार प्रकरणात हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टाचा तूर्तास नकार दिला आहे. 

याबाबत सुप्रीम कोर्टाने संबंधित याचिकाकर्त्यांना हायकोर्टात याचिका दाखल करण्याचे आदेश दिलेत.  हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश या प्रकरणाच्या प्रत्येक पैलूत लक्ष घालतील. कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार हायकोर्टाला आहे. त्याचसोबत या घटनेची न्यायिक चौकशी  करण्यालाही कोर्टाने नकार दिला आहे. हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. बस कशा जळाल्या? हे प्रकरण हायकोर्टात का नेलं नाही? असा सवाल कोर्टाने याचिकाकर्त्यांना विचारला. 

जामिया आणि एएमयू विद्यार्थ्यांकडून वकील इंदिरा जय सिंह यांनी ही घटना एकापेक्षा अधिक राज्यांशी संबंधित आहे. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी. कोर्ट या घटनेकडे दुर्लक्ष करु शकत नाही. ज्याप्रकारे तेलंगणा एन्काऊंटरमध्ये कोर्टाने सुनावणी केली तसे या प्रकरणात निर्देश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. 

यावर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले की, तेलंगणा प्रकरणात एक आयोग गठित करुन घटनेची चौकशी करु शकतो. पण या प्रकरणात समिती बनवू शकत नाही जी संपूर्ण देशातील प्रकरणाकडे लक्ष देईल. पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यापासून सुप्रीम कोर्ट रोखू शकत नाही. जर कोणी कायदा मोडत असेल तर पोलीस काय करणार? त्यामुळे तुम्ही या प्रकरणात हायकोर्टात जाऊ शकतात असं त्यांनी सांगितले. 

कोर्टात पोलिसांच्या बाजूने युक्तिवाद करणारे वकील तुषार मेहतांनी सांगितले की, 68 जखमी लोकांना रुग्णालयात पाठविले आहे. यावेळी कोर्टाने पोलिसांनी विचारले की, विनाचौकशी अटक का केली? यावर मेहतांनी कोणत्याही विद्यार्थ्याला अटक केली नाही, अन् जेलमध्ये पाठविले नाही असा दावा पोलिसांच्या वकीलांकडून करण्यात आला.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयagitationआंदोलनcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकStudentविद्यार्थीPoliceपोलिस