सार्वजनिक ठिकाणी ‘वंदे मातरम्’ गीत गायन अनिवार्य नाही: सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 08:18 IST2026-03-26T08:18:17+5:302026-03-26T08:18:17+5:30
केंद्राच्या निर्देशामधील कलम ५ मध्ये 'गाऊ शकतात' असा शब्द वापरला आहे.

सार्वजनिक ठिकाणी ‘वंदे मातरम्’ गीत गायन अनिवार्य नाही: सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ‘वंदे मातरम्’ या गीतासंदर्भात गृहमंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकाविरोधात केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. गृहमंत्रालयाने काढलेले परिपत्रक हे केवळ दिशानिर्देश आहेत. त्यामुळे सार्वजनिक किंवा इतर कार्यक्रमात वंदे मातरम् गाणे बंधनकारक नाही, असे निरीक्षण नोंदवत संबंधित याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने स्पष्ट नकार दिला. मोहम्मद सईद नूरी यानी गृहमंत्रालयाच्या 'वंदे मातरम्'शी संबंधित परिपत्रकाविरोधात ही याचिका दाखल केली होती.
केंद्राच्या निर्देशामधील कलम ५ मध्ये 'गाऊ शकतात' असा शब्द वापरला आहे. ही याचिका वेळेपूर्वीच दाखल केली असून भेदभावाच्या शक्यतेवर आधारित असल्याचे नमूद करत सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्य बागची व न्या. विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठाने सुनावणीस नकार दिला.