Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयाने मृत्युदंड देण्याच्या पद्धतीवर सरकारला कठोर शब्दांत सुनावलं आहे. न्यायालयाने विचारलं की, “सरकार काळानुसार बदल स्वीकारायला तयार का नाही?” ही टिप्पणी त्या जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान करण्यात आली, ज्यात फाशीऐवजी घातक इंजेक्शन, फायरिंग स्क्वाड, इलेक्ट्रिक चेअर किंवा गॅस चेंबर यांसारख्या आधुनिक आणि “मानवीय” पद्धतींचा विचार करण्याची मागणी करण्यात आली होती.
"सरकार विकसित होण्यासाठी तयार नाही"
'लाईव्ह लॉ'च्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटलं, “समस्या ही आहे की, सरकार विकसित होण्यासाठी तयार नाही. फाशी ही खूप जुनी पद्धत आहे. काळ बदलला आहे, पण शासनाची मानसिकता बदललेली नाही.”
याचिकाकर्त्याची मागणी
याचिकाकर्त्याचे वकील ऋषी मल्होत्रा यांनी न्यायालयात मांडलं की, “किमान दोषी कैद्याला पर्याय तरी द्या, फाशी हवी की घातक इंजेक्शन? घातक इंजेक्शन जलद, वेदनारहित आणि मानवी आहे, तर फाशी ही क्रूर आणि दीर्घकाळ चालणारी आहे. भारतीय सेनेत देखील दोषी अधिकाऱ्यांना मृत्यूच्या पद्धतीचा पर्याय दिला जातो.”
सरकारची भूमिका...
सरकारतर्फे वरिष्ठ वकील सोनिया माथूर यांनी सांगितलं की, “कैद्यांना मृत्यूच्या पद्धतीचा पर्याय देणं, हे नीतिगत (policy) निर्णयाचं प्रकरण आहे. अशा बदलासाठी अनेक प्रशासकीय आणि कायदेशीर निर्णय घ्यावे लागतील. सध्याच्या परिस्थितीत घातक इंजेक्शनसारखा पर्याय देणं शक्य नाही.”
11 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी...
या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला होणार आहे. न्यायालयाने संकेत दिला की, ते मृत्युदंडाच्या मानवीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पुनरावलोकन करण्याच्या बाजूने आहे.
Web Summary : Supreme Court questions the government's reluctance to modernize death penalty methods. Petition seeks humane options like lethal injection. Court expresses concern over outdated hanging method, advocating for review based on scientific and humane perspectives.
Web Summary : उच्चतम न्यायालय ने मृत्युदंड विधियों को आधुनिक बनाने में सरकार की अनिच्छा पर सवाल उठाया। याचिका में घातक इंजेक्शन जैसे मानवीय विकल्पों की मांग की गई है। न्यायालय ने फांसी की पुरानी विधि पर चिंता व्यक्त की, वैज्ञानिक और मानवीय दृष्टिकोणों के आधार पर समीक्षा की वकालत की।