शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
2
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
3
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
4
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
5
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
6
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
7
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
8
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
9
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
10
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
11
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
12
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
13
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
14
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
15
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
16
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
17
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
18
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
19
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
20
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
Daily Top 2Weekly Top 5

‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 05:06 IST

Supreme Court News: राजकीय पक्षांना मिळणाऱ्या रोख देणग्यांबाबतच्या पारदर्शकतेवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर केंद्र सरकार आणि इतरांना नोटीस पाठवून त्यांचे उत्तर मागितले आहे.

नवी दिल्ली -  राजकीय पक्षांना मिळणाऱ्या रोख देणग्यांबाबतच्या पारदर्शकतेवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर केंद्र सरकार आणि इतरांना नोटीस पाठवून त्यांचे उत्तर मागितले आहे. या याचिकेत प्राप्तिकर कायद्यातील एका तरतुदीला आव्हान देण्यात आले आहे, जी राजकीय पक्षांना २,००० रुपयांपेक्षा कमी रकमेची रोख देणगी ‘अनामिक’ पद्धतीने स्वीकारण्याची मुभा देते.

याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, ही अपारदर्शकता निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता कमी करते. रोख देणगी देणाऱ्या व्यक्तीबद्दल आणि त्यांच्या हेतूंबद्दल मतदारांना माहिती मिळत नाही.

कोणाकोणाला नोटीस?न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते खेम सिंह भाटी यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेतली. त्यांनी याबाबत, केंद्र सरकार, निवडणूक आयोग, भाजप आणि काँग्रेस यांसारखे प्रमुख राजकीय पक्ष यांना नोटीस पाठवली. न्यायालयाने हे प्रकरण चार आठवड्यांनंतर सुनावणीसाठी सूचीबद्ध केले आहे.

प्रमुख मागण्या?याचिकाकर्ते खेम सिंह भाटी यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत, त्या खालीलप्रमाणे :आयकर कायद्याचे कलम १३ए (ड) रद्द करावे. जे दोन हजार रुपयांपर्यंतच्या अनामिक रोख देणग्यांना परवानगी देते. राजकीय पक्षांनी कोणत्याही प्रकारची रक्कम रोखीत स्वीकारू नये, अशी अट पक्ष नोंदणीसाठी निवडणूक आयोगाने घालावी. राजकीय पक्षांनी देणगी देणाऱ्या व्यक्तीचे नाव व इतर सर्व तपशील जाहीर करणे बंधनकारक करावे.लेखापरीक्षण आयोगाने नियुक्त केलेल्या ऑडिटरमार्फत व्हावे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Court Notice to BJP, Congress, Govt on Anonymous Cash Donations

Web Summary : Supreme Court seeks response from government, BJP, and Congress regarding transparency in anonymous cash donations to political parties under ₹2,000, potentially impacting electoral integrity. Petitioner demands disclosure of donor details.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMONEYपैसाcongressकाँग्रेसBJPभाजपा