शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालय ही तर सर्वात बेशिस्त जागा; न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मांडले परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 06:23 IST

भूषण गवई हे मे महिन्यात होणार सरन्यायाधीश

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालय ही सर्वांत बेशिस्त जागा आहे अशी टीका त्या न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केली आहे. मी मुंबई उच्च न्यायालय, या न्यायालयाचे औरंगाबाद, नागपूर खंडपीठ येथेही काम केले आहे. पण सर्वोच्च न्यायालयाइतके बेशिस्त वातावरण मी कुठेही पाहिलेले नाही असेही त्यांनी म्हटले आहे. 

विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना हे येत्या मे महिन्यात निवृत्त होत असून त्या पदावर गवई हे विराजमान होणार आहेत. गवई यांनी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील वातावरणाची तुलना केली. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयातील दालनात सहा वकील एका बाजूला तर सहा वकील दुसऱ्या बाजूला बसलेले असतात. एकाच वेळी सर्वजण हे बोलत असतात. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होते. 

उच्च न्यायालयात काम करताना असे दृश्य मला कधीही पाहायला मिळाले नाही. न्यायालयीन कामकाजात अडथळे आणणाऱ्या वकिलांबाबत न्यायमूर्ती भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली.  (वृत्तसंस्था)

उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती होते तेव्हा तिथे असलेले वातावरण त्यांनी यापूर्वी कधीही अनुभवलेले नसते. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू असताना कोणीही कधीही बोलत असतो. या न्यायालयात अतिशय बेशिस्तीचे वातावरण असते. - भूषण गवई, न्यायमूर्ती 

मे महिन्यात गवई होणार सरन्यायाधीश

विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना हे १३ मे २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड निवृत्त झाल्यानंतर खन्ना हे या पदावर विराजमान झाले होते. खन्ना यांच्या निवृत्तीनंतर सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती भूषण गवई विराजमान होतील.

सरन्यायाधीशपदी अनुसूचित जातीतील पहिली व्यक्ती म्हणजे न्यायमूर्ती के. जी. बालकृष्ण होते. त्या प्रवर्गातील सरन्यायाधीशपदी दुसरी व्यक्ती विराजमान होण्याचा मान न्यायमूर्ती भूषण गवई यांना मिळणार आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय