Supreme Court : गेल्या काही दिवसांपासून इथेनॉल मिश्रित(EBP-20) पेट्रोलचा मुद्दा चर्चेत आहे. देशभरात मिळणाऱ्या पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल टाकले जात आहे. मात्र, आता हा मुद्दा आता न्यायालयात पोहोचला आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, सोमवारी सुनावणी होणार आहे.
वाहन मालकांवर सक्ती केली जात आहेलाखो वाहन मालकांना त्यांच्या वाहनांसाठी योग्य नसलेले इंधन वापरण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. ही जनहित याचिका १ सप्टेंबर रोजी मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणीसाठी सूचीबद्ध आहे.
इथेनॉलमुक्त पेट्रोल पुरवण्याची मागणीअधिवक्ता अक्षय मल्होत्रा यांनी दाखल केलेल्या याचिकेत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाला सर्व पेट्रोल पंपांवर इथेनॉलमुक्त पेट्रोल उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे.
इथेनॉलचे प्रमाण दर्शविणारे लेबल लावण्याची मागणीसर्व पेट्रोल पंप आणि वितरण युनिट्सवर इथेनॉलचे प्रमाण दर्शविणारे लेबल अनिवार्यपणे लावावे, अशी विनंती करण्यात आली आहे.