शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टाने आदेश देताच तात्काळ होईल सुटका; सुप्रीम कोर्टाने लॉन्च केले FASTER 2.0 पोर्टल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 18:15 IST

सुटकेशी संबंधित प्रक्रियेत वेग आणण्यासाठी FASTER 2.0 पोर्टल लॉन्च झाले आहे.

न्यायालयीन कामकाजाला गती देण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश (CJI) डीवाय चंद्रचूड यांनी FASTER 2.0 पोर्टल सुरू केले आहे. हे नवीन पोर्टल कैद्यांच्या सुटकेबाबत न्यायालयाच्या आदेशांची माहिती तुरुंग प्राधिकरण, ट्रायल कोर्ट आणि उच्च न्यायालयाला त्वरित पाठवेल. यामुळे कैद्यांची सुटका करण्यात लागणारा बराच वेळ वाचेल. सध्याच्या व्यवस्थेनुसार तुरुंगातून सुटका होण्यास बराच वेळ लागतो. नवीन पोर्टल सुरू झाल्यानंतर या प्रक्रियेला गती येईल आणि कैद्यांची तात्काळ सुटका शक्य होईल.

काल संविधान दिनानिमित्त सुप्रीम कोर्टात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी फास्टर 2.0 पोर्टल लॉन्च केले. सध्याच्या नियमानुसार, सुटका झाल्याची न्यायालयाच्या आदेशाची प्रत अनेक सरकारी विभागांतून जाते. यानंतर न्यायालयाचा आदेश तुरुंग प्राधिकरणापर्यंत पोहोचतो. आदेशाची प्रत मिळाल्यानंतरच कारागृह प्रशासन कैद्याची सुटका करते. म्हणजे न्यायालयाने सुटकेचे आदेश दिल्यानंतरही कैद्याची तुरुंगातून सुटका होण्यास बराच कालावधी लागतो.

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश हिंदीत उपलब्ध असतीलFASTER 2.0 पोर्टल लाईव्ह झाले आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांमध्ये त्वरित संवाद वाढेल, ज्यामुळे देशाची न्यायव्यवस्था सुधारण्यास मदत होईल. FASTER 2.0 व्यतिरिक्त, CJI चंद्रचूड यांनी e-SCR पोर्टलची हिंदी आवृत्ती देखील लॉन्च केली. या पोर्टलवर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश हिंदीत पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.

लोकांनी न्यायालयाला घाबरू नये - सरन्यायाधीशया कार्यक्रमाला संबोधित करताना CJI चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर 'लोक न्यायालय' म्हणून भर दिला. न्यायालयात जाण्यास घाबरू नका, असे त्यांनी जनतेला सांगितले. संविधानानुसार कोणताही वाद लोकशाही पद्धतीने सोडवला जाऊ शकतो. न्यायालये, तत्त्व आणि कार्यपद्धती राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असंही ते यावेळी म्हणाले

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयConstitution Dayसंविधान दिन