शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
4
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
5
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
6
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
7
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
8
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
9
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
10
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
12
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
13
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
14
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
15
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
16
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
17
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
18
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
19
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
20
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई

सुप्रीम कोर्टानं पुढे ढकलली कलम 35-ए वरील सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 12:10 IST

पुढील सुनावणी 27 ऑगस्टला होणार

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या 35-ए कलमाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकवर आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणावर आज सुनावणी घेऊ शकत नसल्याचं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे. या प्रकरणाची सुनावणी 27 ऑगस्टला होणार आहे. हा विषय घटनापीठाकडे द्यायचा का, यावर 27 ऑगस्टला निर्णय होऊ शकतो. 35-ए कलमामुळे भेदभाव नागरिकांमध्ये होत असल्याचं म्हणत दिल्लीतील स्वयंसेवी संस्था 'वी द सिटिझन'नं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

35-ए कलमावरील सुनावणी पाच सदस्यीय खंडपीठानं करावी का, याबद्दल तीन सदस्यीय खंडपीठाला निर्णय घ्यायचा आहे, असं सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती ए. एम, खानविलकर यांनी सुनावणी टाळताना म्हटलं. तीन सदस्यीय खंडपीठातील एक न्यायाधीश व्ही. आय. चंद्रचूड सुट्टीवर असल्यानं सुनावणी होऊ शकली नाही. 35-ए कलमाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी 27 ऑगस्टपासून होणाऱ्या आठवड्यात केली जाईल, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. तीन सदस्यीन खंडपीठाकडून या प्रकरणाची सुनावणी होईल. 

काय आहे कलम 35-ए ?1954 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशावरुन 35-ए कलमाचा समावेश संविधानात करण्यात आला. कलम 35-ए लागू करण्यासाठी तत्कालीन सरकारनं कलम 370 चा वापर केला होता. यामुळे जम्मू-काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तीला राज्यातील संपत्ती खरेदी करता येत नाही. यासोबत राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभदेखील मिळत नाही. राज्याबाहेरच्या व्यक्तींना सरकारी नोकरीतदेखील संधी दिली जात नाही. यामुळे 35-ए कलमाला होतोय विरोध35-ए कलमाला विरोध करताना दोन मुख्य कारणं सांगितली जातात. देशाच्या इतर भागातील नागरिकांना जम्मू-काश्मीरमध्ये देशाचं नागरिक समजलं जात नाही. त्यामुळेच देशाच्या इतर भागातील नागरिकांना जम्मू-काश्मीरमध्ये ना नोकरी मिळते ना त्यांना संपत्ती खरेदी करता येते. यासोबत राज्यातील तरुणीनं राज्याबाहेरील व्यक्तीशी विवाह केल्यास तिला संपत्तीत अधिकार मिळत नाही. यामुळे या कलमाला विरोध होत आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरSupreme Courtसर्वोच्च न्यायालयBJPभाजपाcongressकाँग्रेस