शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
6
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
7
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
8
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
9
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
10
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
11
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
12
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
13
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
14
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
15
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
16
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
17
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
18
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
19
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
20
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!

गुजरात-हिमाचलमध्ये काँग्रेसच्या विजयासाठी समर्थकांकडून राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर हवन 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 8:25 AM

गुजरातमध्ये भाजपा व काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना

नवी दिल्ली - गुजरात व हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज हाती येणार आहेत. गुजरातमध्ये भाजपा व काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. गुजरातमधील निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, तर  काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात आहे. दोन्ही राज्यांत भाजपाचे सरकार येईल, असा अंदाज सर्वच संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे. दरम्यान, दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचा विजय व्हावा, यासाठी समर्थकांकडून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर हवन करण्यात येत आहे. 

निकालांआधीच भाजपाकडून जल्लोषाची तयारीतर दुसरीकडे,  गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजयाची खात्री असलेल्या भाजपाने मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीच जल्लोषाची तयारी सुरु केली होती. रविवारी (17 डिसेंबर ) रात्री भाजपा आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून विविध दावे करण्यात येत होते. तर दुसरीकडे भाजपाने मतमोजणीपूर्वीच मुंबईमध्ये विजयाचे पोस्टर्सही लावले होते. गुजरातमध्येही रविवारी रात्रीच भाजपाकडून विजयाची तयारी पूर्ण केली होती.   

 

गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची  तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात आहे. दरम्यान,  दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे.

182 जागांसाठी गुजरातमध्ये दोन टप्प्यांत सरासरी 68.41 टक्के मतदान झाले आहे. 68 जागांसाठी हिमाचल प्रदेशात 75 टक्के मतदान झाले आहे. गुजरातच्या 33 जिल्ह्यांतील 37 केंद्रांवर मतमोजणी होत आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये 42 केंद्रांवर मतमोजणी होत असून, सर्वत्र कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतदानापूर्वी आलेल्या सर्वच एक्झिट पोलमध्ये दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता बनेल असा दावाकरण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि गुजरात निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारं त्रिकूट म्हणजे हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी भाजपाच्या पराभवाचा दावा केला आहे. केवळ इव्हीएममध्ये घोळ करूनच भाजपा गुजरातमध्ये विजय मिळवू शकेल आणि 18 डिसेंबरच्या आधी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करेल असा आरोप  हार्दिक पटेलने केला आहे.  ईव्हीएमध्ये गडबड झाली नाही तर भाजपाला 82 जागा मिळतील, असं हार्दिक पटेलने म्हटलं आहे.  अहमदाबादस्थित एका कंपनीचे 150 अभियंते मतदान यंत्रांत फेरफार करण्याच्या प्रयत्नात आहेत, पाच हजार मतदानयंत्रांत फेरफार करण्याचा कट आहे. देवाने तयार केलेल्या मानवी शरीरात बदल करता येतात तर मग मानवानेच तयार केलेल्या मतदानयंत्रात का बदल करता येणार नाहीत, असा आरोप हार्दिक पटेल याने केला आहे. दुसरीकडे भाजपाचेच पुण्यातील सहयोगी राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. गुजरातमध्ये भाजप सत्तेपासून दूर राहिल, असं संजय काकडे म्हणाले आहेत.  

 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Himachal Pradesh Assembly Election Results 2017हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2017Himachal Pradeshहिमाचल प्रदेशBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस