शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

सनी लिओनीच्या कंडोमच्या जाहीरातीत नवरात्रीचा संदेश दिल्याने गुजरातमध्ये निर्माण झाला वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 12:32 PM

गुजरातच्या सूरत शहरात अभिनेत्री सनी लिओनीच्या एका जाहीरातीवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकंडोमच्या जाहीरातीचा भलामोठा फलक पाहून सूरत शहरातील नागरीकांना धक्का बसला.सोशल मीडियावर लगेच या जाहीरातीचे पडसाद उमटले.

सूरत - गुजरातच्या सूरत शहरात अभिनेत्री सनी लिओनीच्या एका जाहीरातीवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर कंडोमच्या जाहीरातीचा फलक लावण्यात आला असून, त्यावर सनी लिओनीचा फोटो आहे. त्यावर नवरात्रीचा संदेश असल्याने वाद निर्माण झाला आहे्. या जाहीरात फलकाविरोधात शहरातील एका गटाने निषेध आंदोलन आयोजित केले असून, हा फलक काढून टाकण्याचा इशारा दिला आहे. 

कंडोमच्या जाहीरातीचा भलामोठा फलक पाहून सूरत शहरातील नागरीकांना धक्का बसला. मोबाईलमुळे ही जाहीरात व्हायरल व्हायला वेळ लागला नाही. सोशल मीडियावर लगेच या जाहीरातीचे पडसाद उमटले. नवरात्रीच्या संदेशामुळे धार्मिक भावना दुखावल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. नवरात्री हा गुजरातमधला महत्वाचा उत्सव आहे. देवीच्या वेगवेगळया रुपांची नऊ दिवस पूजा केली जाते. 

होर्डींगवर सनी लिओनीच्या फोटोच्या शेजारी 'नवरात्रीत खेळा, पण प्रेमाने' असा संदेश लिहीला होता. कंडोम बनवणा-या कंपनीने या जाहिरातीच्या माध्यमातून  हिंदूच्या भावना दुखावल्या आहेत असे उद्योजक आणि हिंदू युवा वाहिनीचे अध्यक्ष नरेंद्र चौधरी यांनी सांगितले. आम्ही हा प्रकार अजिबात खपवून घेणार नाही. होर्डींग हटवले नाही तर, आम्ही आमचे आंदोलन अधिक तीव्र करु असा इशारा चौधरी यांनी दिली. भविष्यात पुन्हा कोणी अशी हिम्मत करु नये यासाठी आंदोलन आवश्यक असल्याचे चौधरी यांनी सांगितले. 

सनी लिओनीच्या जाहीरातीवरुन वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील सनी लिओनीवरुन अनेक वाद झाले आहेत. मागच्यावर्षी 'मस्तीझादे' चित्रपटातील एका दृश्यामध्ये धार्मिक भावना दुखावल्या म्हणून सनी लिऑन विरोधात दिल्लीच्या आदर्श नगर पोलिस स्थानकात एफआयआर दाखल झाला होता. त्यावेळी सनीसोबत तिचे सहकलाकार वीर दास, तृषार कपूर आणि दिग्दर्शक मिलाप झवेरी यांच्या नावाचा सुद्धा एफआयआरमध्ये समावेश करण्यात आला होता. 

सनी लिओनी विरोधात दाखल झाला होता १०० कोटींचा अब्रु नुकसानीचा खटलाबिग बॉस सीझन पाचमधील स्पर्धक आणि मॉडेल पूजा मिश्राने अभिनेत्री सनी लिऑन विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यामध्ये पूजाने सनीवर बदनामी केल्याचा आरोप करत तिच्याकडून नुकसानभरपाईपोटी १०० कोटी रुपये मागितले होते.  

टॅग्स :Sunny Leoniसनी लियोनी