Sunny Leone : मथुरेतील सनी लिओनीचा न्यू ईयर कार्यक्रम रद्द; संतांच्या विरोधामुळे आयोजकांचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:21 IST2025-12-31T12:17:35+5:302025-12-31T12:21:00+5:30
Sunny Leone : मथुरा शहरात नवीन वर्षाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला अभिनेत्री सनी लिओनीचा कार्यक्रम स्थानिक संत आणि धार्मिक संघटनांच्या तीव्र विरोधामुळे रद्द करण्यात आला आहे.

Sunny Leone : मथुरेतील सनी लिओनीचा न्यू ईयर कार्यक्रम रद्द; संतांच्या विरोधामुळे आयोजकांचा मोठा निर्णय
उत्तर प्रदेशातील मथुरा शहरात नवीन वर्षाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला अभिनेत्री सनी लिओनीचा कार्यक्रम स्थानिक संत आणि धार्मिक संघटनांच्या तीव्र विरोधामुळे रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सनी लिओनी सहभागी होणार होती. हा कार्यक्रम गुरुवारी म्हणजेच १ जानेवारी रोजी एका बारमध्ये आयोजित करण्यात आला होता. जेव्हा या तिकीट असलेल्या कार्यक्रमाची माहिती समोर आली, तेव्हा स्थानिक संतांनी त्यावर कडाडून आक्षेप घेतला.
श्री कृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासचे सदस्य दिनेश फलाहारी यांनी प्रशासनाला पत्र लिहून या विरोधाची अधिकृत सुरुवात केली. त्यांच्या मते, मथुरा ही भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी असून येथे धार्मिक विधी आणि भक्तीची परंपरा आहे. अशा पवित्र ठिकाणी मनोरंजनाचे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केल्याने ब्रजभूमी आणि सनातन धर्माच्या प्रतिमेला तडा जातो. त्यांनी असाही आरोप केला की, अशा कार्यक्रमांमुळे अश्लीलतेला खतपाणी मिळू शकते, त्यामुळे हे कार्यक्रम ब्रजभूमीपासून दूरच ठेवले पाहिजेत.
सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा
संतांच्या या तीव्र विरोधामुळे अखेर आयोजकांनी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. 'द ट्रंक बार'चे पार्टनर मिथुल पाठक यांनी सांगितलं की, स्थानिक भावनांचा आदर राखून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की, सनी लिओनी व्यासपीठावर कोणतंही सादरीकरण करणार नव्हती, तर ती केवळ डीजे म्हणून उपस्थित राहणार होती.
मिथुल पुढे म्हणाले की, "या कार्यक्रमाबद्दल गैरसमज पसरवले गेले, वास्तविक सनी लिओनी देशातील इतर अनेक भागांमध्ये कोणत्याही विरोधाशिवाय आपले कार्यक्रम करत आहे." याच दरम्यान, आयोजकांनी आता तिकीट खरेदीदारांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रशासनाने अद्याप या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.